छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक राजकीय आणि सिनेसृष्टीतील मंडळी सहभागी झाली होती. त्यानंतर आता या कार्यक्रमात केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे सहभागी होणार आहेत. या भागाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आतापर्यंत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर यांसह अनेक व्यक्ती सहभागी झाले होते. त्यानंतर आता आगामी भागात समीर वानखेडे सहभागी होणार आहेत. याचा एक प्रोमो झी मराठीने नुकतंच प्रसिद्ध केला आहे.
आणखी वाचा : “…त्यात घर चालत नव्हतं”, शशांक केतकरने केला मालिकेच्या मानधनाबद्दल खुलासा, म्हणाला “१२०० रुपये…”

यात अवधूत हा समीर वानखेडेंना “दाऊद इब्राहिमकडून तुम्हाला धमक्या येत आहेत, असं लोकं म्हणतात”, असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर समीर वानखेडेंनी रोखठोक उत्तर दिलं.

आणखी वाचा : Video : “मी शेंगा खाल्ल्या नाहीत…” समीर वानखेडेंवर होणाऱ्या आरोपांवर क्रांती रेडकरची प्रतिक्रिया, म्हणाली “आपली न्याय व्यवस्था…”

“आमच्यासाठी हे खूप लहान गुन्हेगार आहेत आणि त्यांचं नाव घेऊन मी त्यांना आणखी प्रसिद्ध करणार नाही. मी धमक्यांना अजिबात घाबरत नाही”, असे समीर वानखेडेंनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी त्यांना चॅलेंज करतो, तिथे परदेशात बसून धमक्या वैगरे अजिबात देऊ नकोस, हिंमत असेल तर समोर येऊन धमक्या दे”, असे समीर वानखेडे यावेळी उत्तर देताना म्हणाले. सध्या समीर वानखेडेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.