अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा लग्नसोहळा १८ नोव्हेंबर २०२३ रोजी थाटामाटात पार पडला. या जोडप्याच्या लग्नाला जवळच्या नातेवाईकांसह अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नानंतरचा प्रत्येक सण प्रसाद-अमृता मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. नुकतीच अभिनेत्रीने तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या हळदी-कुंकू समारंभाची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली.

अमृताने हळदी-कुंकू समारंभासाठी खास पारंपरिक लूक केला होता. गळ्यात नाजूक असा हार, साधं अन् सुंदर मंगळसूत्र, केसात गजरा, नाकात गोलाकार नथ आणि या शृंगाराला शोभेल अशी गुलाबी रंगाची साडी अभिनेत्रीने नेसली होती. याशिवाय अमृताने परिधान केलेलं हल्यावाचं मंगळसूत्र यामध्ये विशेष उठून दिसत होतं.

हेही वाचा : “हा अत्याचार थांबवा…”, जुई गडकरी ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून संतापली, पोस्ट शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री ही पोस्ट शेअर करत लिहिते, “घरचं हळदी कुंकू…मी थकुन बसले होते…ही माहेरची साडी आहे. कारण, अखिल भारतीय नाट्य परिषद, जळगाव…यांनी मला ती खास ‘खान्देश कन्या’ म्हणून भेट दिली आहे. या साडीवर खास ही आगळी वेगळी नथ डिझाइन करून घेतली आहे.”

हेही वाचा : तरुणाकडून श्वानाला बेदम मारहाण; व्हायरल व्हिडीओ पाहून रितेश देशमुख संतापला; म्हणाला, “याला तुरुंगात…”

दरम्यान, अमृताच्या या सुंदर लूकवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीचा हा मराठमोळा लूक प्रत्येकाच्या पसंतीस उतरला आहे. तिचा पती अभिनेता प्रसाद जवादेने देखील बायकोच्या हळदी-कुंकू समारंभातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिचं कौतुक केलं होतं.