गणरायांच्या आगमनामुळे सर्वत्र उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मनोरंजन विश्वातही बॉलीवूडपासून ते मराठी सिनेसृष्टीतदेखील सेलिब्रिटींनी वाजत गाजत गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने रितेश देशमुख, विवेक सांगळे, स्वप्निल जोशी, अमित भानुशाली, अंकिता लोखंडे याचबरोबरचं अनेक कलाकार मंडळींनीही गणपतीच्या आगमनाचा आनंद आणि उत्साह सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता अभिजीत केळकरने शेअर केलेल्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिजीतच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. अभिजीतने सोशल मीडियावर त्याच्या घरच्या बाप्पाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.गणपतीचा व्हिडीओ पोस्ट करत अभिजीतने सांगितलं की, “आमच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची मूर्ती अभिजीतच्या भाच्याने घडवली आहे”. त्याचबरोबर स्वत: अभिजीत आणि त्याची दोन मुलं राधा व मल्हार या तिघांनी मिळून बाप्पाच्या मूर्तीला रंग देण्याचं काम केलं आहे.

अभिजीतने पुढे असंही सांगितलं की, “बाप्पाच्या सजावटीसाठी त्याचा मुलगा मल्हार याने स्वत:च्या हाताने मोराचं छोटंसं डेकोरेशन केलं आहे.”अभिजीत केळकरने शेअर केलेल्या घरच्या गणपतीच्या सजावटीला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. या व्हिडीओमध्ये बाप्पाबरोबर अभिजीतची दोन छोटी मुलं दिसत आहेत.

हेही वाचा- गणेशोत्सावाच्या निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशीने बनवले उकडीचे मोदक, तिच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत म्हणाले…

अभिजीतने त्याच्या घरच्या बाप्पाचं साध्या पद्धतीने पण रेखीव अशी सजावट केली आहे. त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे. त्याशिवाय या व्हिडीओबरोबरच अभिजीतने त्याच्या गावच्या घरातल्या गणपतीच्या मूर्तीचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. “हा कोकणातल्या आमच्या मूळ घरातला गणपती बाप्पा आहे”, असं त्याने कॅप्शन दिलं आहे. लाल रंगाच्या जास्वंदीच्या फुलांनी सजवलेली ही गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर दिसत आहे.

हेही वाचा- “माकड आहे, इडलीवाला आहे…”, जान्हवी किल्लेकरच्या पतीला केलं जातंय ट्रोल; म्हणाला, “जिकडे बघावं तिकडे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजीत केळकरच्या कामाबद्दल सांगायचं तर, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ आणि ‘काकस्पर्श’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं गेलं. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत त्याने खलनायकाची भूमिका साकारली होती. अभिजीत ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात देखील झळकला होता. अभिजीत सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सध्या सुरू असलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील सदस्यांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत तो कायमच सोशल मीडियाद्वारे विरोध दर्शवत असतो. काही दिवसांपूर्वी निक्कीने वर्षा उसगांवकर यांच्यावर केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे अभिजीतने सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला होता.