‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो या शोशिवाय अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतो आणि तिथले फोटो, व्हिडीओ सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत असतो. नुकताच गौरवने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो खासदार सुजय विखे यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहे.

पराठा बनवण्यावरून आईशी वाद; प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेत आत्महत्या

“महापशुधन एक्स्पो २०२३ शिर्डी मध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील साहेब यांच्याबरोबरचा एक खास क्षण,” असं कॅप्शन देत गौरवने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आणि सुजय विखे ‘माय नेम इज लखन’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौरवने महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून अभिनय करायला सुरुवात केली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून गौरवने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून गौरव घराघरात पोहोचला. गौरवने ‘संजू’, ‘कामयाब’, ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात देखील काम केलं आहे.