Gharoghari Matichya Chuli : छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवली जाते. महाराष्ट्रातील घराघरांत या मालिका पाहिल्या जातात. मालिकांचं शूटिंग जवळपास १२-१३ तास सलग चालू असतं. यातही सध्याच्या काळात ‘महासंगम’, ‘महाएपिसोड’ असे विविध ट्रेंड सुरू झाले आहेत. त्यामुळे टीआरपी वाढवण्यासाठी मालिकांमध्ये नेहमी काही ना काही रंजक वळणं आणली जातात.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गेल्या आठवड्यात ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिकांचा महासंगम दाखवण्यात आला होता. मधुभाऊंच्या जीवाला धोका असल्याने सायली तिच्या मधुभाऊंना काही दिवस जानकीकडे राहायला पाठवते. मात्र, ऐश्वर्यामुळे ही माहिती महिपतपर्यंत पोहोचते.

मधुभाऊंवर हल्ला करण्यासाठी महिपत त्याच्या गुंडांना पाठवतो. पण, ऐनवेळी मधुभाऊंना वाचवण्यासाठी जानकी या गुंडांसमोर येते आणि तिच्या हाताला गोळी लागल्याचा थरारक सीन या महासंगम विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. यानंतर जानकी बेशुद्ध होते…लगेच हृषिकेश काळजीपोटी तिला घेऊन डॉक्टरकडे जातो असं मालिकेत पाहायला मिळालं. मात्र, यानंतर घडलेली चूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जानकीच्या हाताला गोळी लागल्यावर डॉक्टर तिला मलमपट्टी करतात. पण, डॉक्टरांनी ब्लाऊजवरच मलमपट्टी केल्याचा सीन मालिकेत दाखवण्यात आला आहे. हा अजब सीन पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर झालं आहे. जखमेवर मलमपट्टी करताना, निर्जंतुक कापड (गॉझ पॅड) वापरलं जातं. हे कापड थेट जानकीच्या ब्लॉऊजवर गुंडाळून त्यावर रक्ताचे डाग दाखवण्यात आले आहे. “आता कोणता डॉक्टर ब्लाऊजवर थेट मलमपट्टी करतो?” असा प्रश्न नेटकऱ्यांनी जानकीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून विचारले आहेत.

जानकीच्या ब्लाऊजवर डॉक्टर मलमपट्टी करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. “जानकीच्या ब्लाऊजला लागलं असेल”, “कपड्यांवर कोण मलमपट्टी करतं?”, “हे कालच्या भागात पाहून वाटलंच…ब्लाऊजवर मलमपट्टी करणं कसं शक्य आहे?”, “ते वेडे नाहीये आपण मालिका बघणारे दीडशहाणे आहोत”, “अवघड आहे…” अशा भन्नाट प्रतिक्रिया या व्हायरल व्हिडीओवर आल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rupali Mohite-jadhav (@deva_chi_aai_rupai)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Gharoghari Matichya Chuli
Gharoghari Matichya Chuli ( नेटकऱ्यांच्या कमेंट्स )

दरम्यान, मालिकेतील ही मजेशीर चूक नेटकऱ्यांनी अचूक हेरली आहे. तसेच काही युजर्सनी प्रेक्षकांना इतकंही वेडं समजू नकात असा सल्ला कमेंट्समध्ये दिला आहे.