Gharoghari Matichya Chuli upcoming twist: ‘घरोघरी मातीच्या चु’ली’ या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. जानकी, हृषिकेश, ऐश्वर्या, सारंग, सौमित्र, अवंतिका ही सगळीच पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत.
ऐश्वर्या रणदिवे कुटुंबाविरुद्ध अनेक कारस्थाने करताना दिसते. त्यासाठी तिने सारंगला विश्वासात घेतले आहे. त्यानेदेखील ऐश्वर्यावर विश्वास ठेऊन स्वत:च्याच भावाविरुद्ध कट कारस्थाने केली. शेवटी त्याला ऐश्वर्याचे सत्य समजले, तिचा खरा चेहरा त्याच्यासमोर आला.
त्यानंतर सारंगने ऐश्वर्याचे कारस्थान सर्वांसमोर यावे यासाठी जानकी व हृषिकेशची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सारंगचा मृत्यू झाला आहे, अशी योजना आखून ऐश्वर्याला तिच्याच जाळ्यात फसवण्याचे ठरवले. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये ऐश्वर्या जानकी व हृषिकेशसमोर एक अट ठेवणार असल्याचे दिसत आहे.
हृषिकेश-जानकी काय करणार?
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की ऐश्वर्या जानकी व हृषिकेशजवळ आली आहे. ती जानकीला म्हणते की तुझी आई माझ्या ताब्यात आहे, तुला जर तुझी आई जिवंत पाहिजे असेल तर मी हृषिकेशशी लग्न करणार. हे ऐकताच जानकी तिच्या कानाखाली मारते.
जानकी संतापाने ओरडत म्हणते की काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही. तितक्यात ऐश्वर्या म्हणते की, हृषिकेश हेच वाक्य मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. हृषिकेश म्हणतो की, जानकी तुझ्या आईला वाचवण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. ऐश्वर्या खोलीतून बाहेर गेल्यावर जानकी व हृषिकेश एकमेकांकडे पाहत हसतात. जानकी म्हणते की जोपर्यंत तिने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला मिळत नाही, तोपर्यंत हे नाटक असंच सुरू ठेवायचं. त्यानंतर ते एकमेकांच्या हातात हात देतात.
हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “हृषिकेश-जानकी करणार ऐश्वर्या विरुद्ध गनिमी कावा”, अशी कॅप्शन दिली आहे.
आता मालिकेत नेमकं काय घडणार? ऐश्वर्याचे सत्य समोर आणण्यासाठी हृषिकेश खरंच तिच्याशी लग्नगाठ बांधणार का? सारंग या सगळ्याचा सामना कसा करणार? सारंग जिवंत असल्याचे ऐश्वर्याला समजणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.