टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लग्नबंधनात अडकली आहे. तिने गुरुवारी (२५ एप्रिल रोजी) मुंबईतील इस्कॉन मंदिरात बिझनेसमन दिपक चौहानशी लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आरतीचा मामा सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता गोविंदाही लग्नात उपस्थित राहिला, यावेळी त्याची भेट हिंदुस्थानी भाऊशी झाली.

गोविंदा व हिंदुस्थानी भाऊच्या भेटीचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘विरल भयानी’ने शेअर केलेल्या व्हिडीओत दोघेही भेटतात, गोविंदा हिंदुस्थानी भाऊच्या गालावर प्रेमाने मारतो मग ते गळाभेट घेऊन एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात. हिंदुस्थानी भाऊची भेट घेतल्यावर गोविंदा “आपण एकत्र जेवण करू” असं त्याला म्हणतो. दोघांचाही हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

Video: मामा-भाच्याचं वैर, पण भाचीच्या लग्नाला पोहोचला गोविंदा; आरती सिंहबद्दल म्हणाला…

आरती सिंहच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. अखेर अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. आरतीचा भाऊ कृष्णा अभिषेक व गोविंदा यांचा बऱ्याच वर्षांपूर्वी वाद झाला होता, त्यानंतर ते एकमेकांशी बोलत नाहीत, त्यामुळे आरतीच्या लग्नात गोविंदा येणार की नाही याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. पण मामा गोविंदा भाच्यावर असलेला राग बाजूला सारून भाचीच्या लग्नात पोहोचला.

Video: गोविंदाची भाची झाली चौहानांनी सून, आरती सिंहच्या लग्नाला कलाकारांची मांदियाळी, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरती सिंह ही गोविंदाच्या बहिणीची मुलगी आहे. तिने आजवर ‘मायका’, ‘थोडा है बस थोडा की जरुरत है’, ‘परिचय’, ‘उत्तरन’, ‘उडान’, ‘ससुराल सिमर का’ यासारख्या टीव्ही मालिका केल्या आहेत. आरती शेवटची ‘श्रावणी’ मालिकेत दिसली होती. याशिवाय ती बिग बॉस १३ मध्येही सहभागी झाली होती.