प्रिन्स नरुला-युविका चौधरीच्या घरी काही दिवसांपूर्वीच चोरी झाली होती. घरात काम करणाऱ्यानेच त्यांच्या घरी चोरी केली. युविका चौधरीने तिच्या व्लॉगमध्ये चोरी झाल्याचे सांगितले होते.

आता गुरमित चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांच्या घरासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. नोकराने त्यांच्या घरातून चोरी केली. तो मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेला. सुदैवाने त्यावेळी अभिनेता घरी होता, त्याच्या दोन्ही मुली आणि कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. चोरालाही पकडण्यात आले आणि मौल्यवान वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. पण, अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना याबद्दल माहिती देऊन सर्वांना सतर्क केले आहे.

गुरमित चौधरीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “अलर्ट. आज एका नवीन कामगाराने (नोकराने) आमच्या घरातून काही वस्तू चोरल्या आणि तो पळून गेला. सुदैवाने, आम्ही कोणालाही कामावर ठेवण्यापूर्वी नेहमीच पडताळणी करतो. म्हणून आम्ही त्वरित कारवाई केली. सुदैवाने मी त्यावेळी घरी होतो आणि माझ्या मुली त्यांच्या खोलीत सुरक्षित आहेत. आम्ही बहुतेक वस्तू परत मिळवल्या आहेत आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही सर्व सुरक्षित आहोत. थोडेसे नशीब खराब होते; परंतु ही एक धडा घालून देणारी अशी आठवण आहे- नेहमी सतर्क राहा. तुमच्या घरी कोणालाही कामावर ठेवण्यापूर्वी त्याची पडताळणी करा.”

गुरमितच्या या अपडेटनंतर सर्वांना सैफ अली खानची आठवण आली. कारण- काही काळापूर्वी एका अज्ञात व्यक्तीने सैफच्या घरात घुसून अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला होता.

काही महिन्यांपूर्वीच घराची खरेदी

दोन मुलींचे पालक असलेल्या गुरमित आणि देबिना यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत एक नवीन घर खरेदी केले होते. त्यांनी त्यांच्या नवीन घराची आणि गृहप्रवेशाची झलक सोशल मीडियावरही दाखवली होती. या घराची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जात होते.

Gurmeet Choudhary
‘या’ लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी झाली चोरी. (फोटो : इन्स्टाग्राम)

२०११ मध्ये लग्नगाठ

गुरमीत आणि देबिना यांनी छोट्या पडद्यावर भगवान राम-सीतेची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली. २०११ मध्ये त्यांचे लग्न झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरमितच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘ये काली काली आँखे सीझन २’ या वेब सीरिजमध्ये दिसला होता, जी गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रसारित झाली होती. त्यानंतर तो महाराणा प्रताप यांच्या बायोपिक असलेल्या ‘महाराणा’ या वेब सीरिजमध्ये दिसणार होता; परंतु अद्याप त्याबद्दल कोणतीही अपडेट नाही.