प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांचा शाही विवाहसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा झाली. अक्षया आणि हार्दिक यांनीही बरेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ऑनस्क्रीन ते खऱ्या आयुष्यातले नवरा-बायको असं त्यांचं लग्न बरंच गाजलं. पण आता लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत अक्षया आणि हार्दिकने लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात काय काय बदललं हे सांगितलं आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी नुकतीच ‘साम टीव्ही’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीपासून ते लग्नापर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडून सांगितला आणि दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी दोघांनाही ‘लग्नानंतर काय काय बदललं आणि हे बदल अंगवळणी पडतायत का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी रील लाइफ आणि रिअल लाइफमध्ये खूप फरक असतो असं सांगितलं.

आणखी वाचा- जिनिलीयाने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठ्याने हाक मारली अन्…

लग्नानंतर झालेल्या बदलांबद्दल बोलताना अक्षया म्हणाली, “बदल खूप झाले आणि मला अजूनही त्याच्याशी पूर्णपणे जुळवून घेता आलेलं नाही. लग्न झालंय आता ही खूप वेगळी भावना आहे. आपण कोणत्या ना कोणत्या व्यक्तिरेखेसाठी नेहमीच गळ्यात मंगळसूत्र घालतो, साडी नेसतो. पण खरोखर लग्न होतं तेव्हा खूप वेगळी भावना असते. रील लाइफमध्ये आणि रिअल लाइफमध्ये हे सगळं घडतं त्यात खूप फरक असतो. गळ्यात मंगळसूत्र, साडी हे सगळं मी खूप एन्जॉय करतेय.”

आणखी वाचा- नववर्षात राणादा पाठकबाईंसाठी करणार खास संकल्प, म्हणाला “आता लग्नानंतर…”

हार्दिक म्हणाला, “कामं सुरूच आहेत. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून मी काम सुरू केलंय. पण लग्न झालं हे मी अजूनही विसरतो. सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडतो तेव्हा विसरून जातो की घरी बायको आहे. तिला सांगून गेलं पाहिजे. म्हणजे प्रेम आहे पण ते विसरायला होतं की आपलं लग्न झालेलं आहे. पण मी आता प्रयत्न करेन की असं होणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अक्षया आणि हार्दिक २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. नातेवाईक आणि जवळचे मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत अगदी राजेशाही थाटात हा लग्नसोहळा पार पडला. त्याचबरोबर त्यांच्या लग्नात मनोरंजन क्षेत्रातील काही कलाकारही आवर्जून उपस्थित होते.