‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण यावेळेस अभिनयातून नाही तर सूत्रसंचालनातून. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकल्यानंतर हार्दिक आता ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ‘झी मराठी’वर हा नवा रिअ‍ॅलिटी शो सुरू होत असून या शोमधील ६ स्पर्धकांची नाव जाहीर झाली आहेत. हे स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या…

हेही वाचा – Dunki Drop 2: शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘डंकी’ चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित; बादशहाबरोबर तापसी पन्नू झळकली रोमँटिक अंदाजात

‘जाऊ बाई गावात’ हा रिअ‍ॅलिटी शो ४ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोमवार ते शनिवारी रात्री ९.३० वाजता हा शो प्रसारित होणार आहेत. या शोमधील सहा स्पर्धकांची नाव जाहीर झाली आहे. त्यामधील पहिली स्पर्धेक आहे, श्रीमंत घरची नात, जिला घाबरतात सर्व घरात अशी स्नेहा भोसले. जी लेडी डॉन आहे, तिच्या किक बॉक्सिंगचा सगळीकडे बोलबाला आहे. दुसरी स्पर्धक आहे, पापा की परी संस्कृती साळुंखे. जिचा चॉईसच महाग आहे, क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा तिला अभिमान आहे, तिच्या समोर कोणी काहीही लपवू शकत नाही.

हेही वाचा – भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण; अभिनेत्री माहिती देत म्हणाली, “मित्रांनो सावध …”

तिसरी स्पर्धक आहे फॅशन दिवा रसिका ढोबळे, जिच्या फॅशन फिगरवर सर्व फिदा आहेत. चौथी स्पर्धक आहे प्लस साइझ मॉडेल हेतल पाखरे. जिचं वजनदार व्यक्तिमत्व आहे. या शोची पाचवी स्पर्धक आहे सुरेल संस्कारी श्रेजा म्हात्रे. मॉडेल आणि सोशल मीडियाची ती राणी आहे. सहावी स्पर्धक मोनिशा आजगावकर आहे. फोटोग्राफी आणि सामाजिक कार्याची हिला आवड आहे. आपल्या कॅमेरामध्ये जी दुनियेला कैद करते.

हेही वाचा – Video: सलमान खानने भरगर्दीत महिलेला केलं किस; व्हायरल व्हिडीओमधील ‘ती’ महिला कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एक अफलातून संकल्पना असलेला हा नवीन रिअ‍ॅलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. ४ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.