मराठी कलाविश्वात अभिनेत्री हेमांगी कवीने आपल्या अभिनयाचा एक वेगळा उमटवला आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये तिने काम केलेलं आहे. अभियाबरोबरच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने दिवाळीनिमित्त नुकतेच तिच्या कुटुंबीयांबरोबरचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंना हेमांगीने तिच्या शैलीत कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : Video: “तू विसरून जा की आपलं लग्न झालंय,” अंकिता लोखंडेने नवऱ्याला जोरदार सुनावलं; विकीच्या ‘त्या’ कृतीमुळे संताप अनावर

हेमांगी कवीने दिवाळीनिमित्त तिच्या नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत याला “मी तुझी लक्ष्मी तू माझ्याकडेच पहा, होणारे मीच प्रसन्न ऐक सल्ला हा महा! बाकी तुमच्यावरही लक्ष्मी प्रसन्न होवो ह्याच शुभेच्छा! #लक्ष्मीपूजन” असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीचं हे कॅप्शन वाचून एका नेटकऱ्याने तिच्या वाक्यरचनेतील चूक काढत अभिनेत्रीवर टीका केली. “होणारे नाही हो होणार आहे…. आणि हे मराठी कलाकार…” अशी टीकात्मक कमेंट या संबंधित युजरने अभिनेत्रीच्या फोटोवर केली आहे.

आता हेमांगीने यावर रोखठोक उत्तर देत आपली बाजू स्पष्ट केली आहे. अभिनेत्री लिहिते, “बाकी कॅप्शन व्यवस्थित लिहिलंय ते दिसत नाही. म्हणजे किती नकारात्मक असावं नाही का एखाद्याने! मोठ्या शुभ्र पांढऱ्या कॅनव्हासवर सूक्ष्म काळा ठिपका बघणा’रे’ हे लोक! च च च!” अभिनेत्रीच्या चाहत्यांनी देखील या टीका करणाऱ्या युजरची कमेंट सेक्शनमध्ये चांगलीच शाळा घेतली आहे.

हेही वाचा : दिवाळीच्या पाडव्याला प्रिया बापट उमेशकडून काय गिफ्ट घेणार? अभिनेत्री म्हणाली, “माझ्या नवऱ्याने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
hemangi
हेमांगी कवी

दरम्यान, अभिनेत्री हेमांगी कवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अलीकडेच ती रवी जाधव यांच्या ‘ताली’ सीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय अभिनेत्रीने बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका जाहिरातीमध्ये काम केलं आहे.