अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाविरुद्ध लढत आहे. हिनावर उपचार सुरू झाल्यापासून, ती तिच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत आली आहे. अलीकडेच हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये ती मुंबईतील हिवाळ्याचा आनंद घेताना दिसत आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम हीना खानने तिचे नवीन फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती तिच्या बाल्कनीत उभी असल्याचे दिसून येते. याच फोटोमध्ये तिने अंगावर उबदार शाल पांघरली असून, डोक्यावर लोकरीची टोपी घातलेली दिसते. हिवाळ्यातील आल्हाददायी थंडगार वातावरणाचा आस्वाद घेत असलेल्या तिच्या चेहऱ्यावरील तेजस्वी हास्य आशा आणि सकारात्मकतेचा संदेश देते. हिनाने आपल्या कॅप्शनमध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अलीकडेच तिने अनुभवलेल्या कठीण काळाबद्दलचा खुलासा केला आहे.

हेही वाचा…भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”

हिनाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करीत लिहिले, “गेल्या १५-२० दिवसांचा हा प्रवास माझ्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कठीण होता. या प्रवासात माझ्या शरीरावर जखमाही झाल्या; पण मी घाबरून न जाता, त्याला सामोरी गेली. मी लढले, आणि आजही मी लढतेय.”

पाहा फोटोज –

हिनाने वाईट काळातही आपण जिद्द ठेवायला हवी आणि या काळातही आनंद शोधायला हवा, असे सांगितले. ती म्हणाली, “सर्व वेदना आणि इतर गोष्टींना सामोरे जाण्यासाठी, मला सकारात्मकतेचं चक्र सुरू ठेवण्यासाठी या आशेने मुद्दाम हसत राहावं लागतं, की खरा आनंद नैसर्गिकरीत्या येईल. आणि तो आला.”

हेही वाचा…नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वतःच्या चाहत्यांना त्यांच्या संघर्षात खंबीर राहण्याचा संदेश देत हीनाने पुढे म्हटले, “जीवन फक्त ‘चालू राहते’, असे म्हणून पुढे जात नाही. प्रत्येक दिवशी परिस्थिती कशीही असली तरीही आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो. आशा आहे की, तुम्हाला तुमच्या जीवनातील लढाईसाठी अशीच ताकद मिळेल. आशा आहे की, आपण सगळे विजयी होऊ.” हिनाने चाहत्यांना जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हसत राहण्याची आठवण करून दिली. हिनाच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करीत तिच्या हिमतीचे कौतुक केले आहे.