झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'होणार सून मी ह्या घरची' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ही मालिका एकेकाळी चांगलीच गाजली होती आणि ही जोडी तुफान लोकप्रिय झाली होती. या मालिकेत या दोघांनी जान्हवी आणि श्री या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील जान्हवी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानचा 'काहीही हं श्री' हा संवाद त्यावेळी खूपच लोकप्रिय झाला होता. प्रचंड गाजलेली ही मालिका या संवादामुळेही चर्चेत राहिली होती. पण आता हाच संवाद पुन्हा चर्चेत आला आहे ते एका व्हायरल व्हिडीओमुळे. याच संवादावर एक चाहत्यानं भन्नाट गाणं तयार केलंय. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आणखी वाचा- ‘झी मराठी’ वाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी मोठा निर्णय, ‘या’ जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला अहम रोहित या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये झी मराठीच्या अधिकृत पेजलाही टॅग करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला जान्हवी श्रीला 'काहीही हं श्री' असं म्हणताना दिसत आहे आणि त्यानंतर 'मेरे नॉटी सैय्या जी' या हिंदी गाण्याबरोबर त्याचं मॅशअप करून हे भन्नाट गाणं तयार करण्यात आलं आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक युजर्सच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. आणखी वाचा- “आदिल खान ड्रग्ज घ्यायचा आणि…”, राखी सावंतचा धक्कादायक खुलासा या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान झी मराठी वाहिनीचा टीआरपी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरताना दिसत आहे. त्यामुळे या वाहिनीने त्यांचे लोकप्रिय ठरलेले शो पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार झी मराठीने ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे.