झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका या प्रेक्षकांमध्ये फार प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीवर विविध धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकांच्या हटके विषयामुळे अनेक प्रेक्षक त्याला पसंती देताना पाहायला मिळतात. पण आता झी मराठी वरील दोन जुन्या मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतंच या वाहिनीने याबद्दलची घोषणा केली.
झी मराठी वाहिनीचा टीआरपी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरताना दिसत आहे. त्यामुळे या वाहिनीने त्यांचे लोकप्रिय ठरलेले शो पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार झी मराठीने ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा : “तुम्हाला मानधन मिळेल पण…” ‘तारक मेहता…’ शैलेश लोढांच्या आरोपांवर मालिकेच्या टीमने दिले स्पष्टीकरण
येत्या १३ फेब्रुवारी २०२३ पासून ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जाणार आहे. संध्याकाळी ४ आणि ५ वाजता अनुक्रमे या मालिका प्रसारित होणार आहे. मनोरंजन मराठी या इन्स्टाग्राम पेजने याबद्दलची माहिती दिली आहे. पुन्हा एकदा अनुभवा श्री-जान्हवी आणि जय-आदिती यांच्या प्रेमकथेचा अनुभव घेऊया” असे कॅप्शन त्यांनी याला दिले आहे.
आणखी वाचा : शिवाली परबच्या नव्या फोटोशूटवर चाहता फिदा, थेट लग्नाची मागणी घालत म्हणाला…
दरम्यान प्रेक्षकांच्या आग्रहाखातर या मालिका पुन्हा प्रसारित केल्या जात आहेत, असे बोललं जात आहे. तर दुसरीकडे झी मराठी वाहिनीचा घसरलेला टीआरपी सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.