Hruta Durgule’s Husband Buys New Car : हृता दुर्गुळे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती तिच्या ‘आरपार’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामधून तिच्या नवऱ्याने आलिशान गाडी खरेदी केल्याचं पाहायला मिळतं.
हृता दुर्गुळेच्या नवऱ्याने म्हणजेच प्रतीक शाहने गणेशोत्सवाचं अवचित्य साधून नवीन आलिशान बीएमडब्लूय (BMW) ही गाडी खरेदी केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. हृता व प्रतीक यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे.
प्रतीकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टला हृतानेही शेअर करत त्यावर कमेंट केलेली पाहायला मिळते. अभिनेत्रीने नवऱ्याने नवीन गाडी खरेदी केल्यानिमित्त त्याचं कौतुक केलं आहे. प्रतीकने शेअर केलेल्या पोस्टला त्याने “या गणेश चतुर्थीला आम्ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नवीन गाडी खरेदी केली आहे, गणपती बाप्पा मोरया” अशी कॅप्शन दिली आहे.
हृता दुर्गुळेने केलं नवऱ्याचं कौतुक
हृता दुर्गुळेने या पोस्टखाली ‘सो सो प्राउड ऑफ यू बेबी’ अशी कमेंट केली आहे. तिने यामधून मला तुझा खूप अभिमान असं म्हटलं आहे. हृता व प्रतीकने शेअर केलेल्या या पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. नवीन आलिशान गाडी खरेदी करताना प्रतीकबरोबर हृता व त्याची आई अभिनेत्री मुग्धा शाह उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. त्याने त्याच्या आई व बायकोबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.
हृता व तिचा नवरा सोशल मीडियावर सक्रिय असतात. यामार्फत ते अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. दोघे अनेकदा परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात, त्यावेळच्या अनेक आठवणी ते सोशल मीडियावर पोस्ट करत शेअर करताना दिसतात. तसेच यासह ते त्यांच्या कामासंबंधित अपडेटदेखील शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.
दरम्यान, हृता दुर्गुळे लवकरच गौरव पत्की दिग्दर्शित ‘आरपार’ चित्रपटातून झळकणार आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता ललित प्रभाकरही झळकणार आहे. दोघे पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र काम करणार आहेत. सध्या या चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली असून येत्या १२ सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.