Irina Rudakova : ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वातील सर्वच कलाकार अजूनही चर्चेत आहेत. घरातून बाहेर आल्यानंतर अनेक जण आपापल्या कामांमध्ये व्यग्र झालेत. मात्र, तरीही चाहत्यांसाठी ते सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करीत असतात. अशात आता बिग बॉसच्या घरात झळकलेली ‘परदेसी गर्ल’ इरिना रुडाकोवा नुकतीच चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर लावणी शिकतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

‘बिग बॉस’ फेम इरिना रुडाकोवाला भारतीय संस्कृती फार आवडते. ती अनेकदा मराठमोळ्या लूकमध्ये सजलेली दिसली आहे. इरिनाला मराठी बोलता येत नाही; मात्र तिला सर्व मराठी समजतं. यंदा इरिनानं महाराष्ट्रातील गणेशोत्सव, दिवाळी असे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे केलेत. तिला मराठी संस्कृती अधिक चांगल्या रीतीनं जाणून घ्यावीशी वाटते. त्यासाठी ती नेहमी काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करते.

हेही वाचा : अमेरिका सोडून माधुरी दीक्षित मायदेशी काय परतली? म्हणाली, “माझे आई-बाबा आणि दोन्ही मुलं…”

गोव्यात पार पडणाऱ्या इफ्फी (International Film Festival of India) ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४’ मध्ये इरिनाने हजेरी लावली आहे. येथेच तिने लावणीतील काही स्टेप्स शिकून घेतल्या आहेत. याचा व्हिडीओदेखील तिने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती लावणी कलाकारांसह काही स्टेप्स शिकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इरिना दिवंगत प्रसिद्ध गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ‘खेळताना रंग बाई होळीचा’ या लावणीवर डान्स करत आहे. तिच्या आजुबाजूला काही लावणी सादर करणाऱ्या कलाकार आहेत. त्यांनी इरिनाला सुंदर स्टेप्स शिकवल्यात.

इरिनाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी सुंदर कमेंट्स केल्यात आणि लाइक्सचाही वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं तर तिला कमेंटमध्ये म्हटलंय, “असं वाटतं तू महाराष्ट्रातील एका मुलाशी लग्न केलं आहेस.” तर आणखी एकानं “महाराष्ट्राची सुंदरी इरिना दी”, असं लिहिलं आहे.

हेही वाचा : नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाचा विवाहसोहळा पाहता येणार ओटीटीवर, ‘या’ प्लॅटफॉर्मने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’च्या घरात असताना इरिनाचं नाव वैभव चव्हाणबरोबर जोडलं जात होतं. या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांनाही फार आवडली. त्यानंतर शोमधून बाहेर आल्यावर इरिना आणि वैभवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्येदेखील तिनं नारिंगी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तसेच तिनं वैभवबरोबर एका गाण्यावर रील व्हिडीओ बनवला होता. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दोघांनाही लग्न करा, असा सल्ला दिला होता.