अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना यांना इंडस्ट्रीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर हे दोघे नेहमीच सक्रिय असतात. गेली ६ वर्ष ही दोघे एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. त्यामुळे ही दोघे कधी लग्न करणार याबाबत चाहत्यांना उत्सुक्ता लागली आहे. नुकतंच ईशाने एका मुलाखतीत लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये दाखल; व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली माहिती

ईशा केसकरने अलीकडेच ‘संपूर्ण स्वराज’च्या पॉडकास्ट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने लग्न कधी करणार याबाबत खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, मी आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. यामध्ये सीन दरम्याने अनेकदा माझं लग्न झालं आहे. त्यामुळे पुन्हा थाटामाटत लग्न करण्याची माझी इच्छा नाही. माझं आधीच १३ वेळा लग्न झालं आहे त्यामुळे पुन्हा थाटामाटात लग्न करण्याची माझी अजिबात इच्छा नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईशाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘जय मल्हार’ मालिकेतील बानू आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनायाची तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. काही दिवसांपूर्वी तिचा सरला एक कोटी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता ओंकार भोजन मुख्य भूमिकेत होता. तर ऋषीने ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून मराठी मनोरंजनसृष्टीत पदापर्ण केलं होतं. छोट्या पडद्यावर ही जोडी चांगलीच लोकप्रिय आहे.