अभिनेत्री शमिता शेट्टीचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता राकेश बापट हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं आहे. त्यानं स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून याबाबत चाहत्यांना माहिती दिली. अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं पाहून राकेशच्या चाहत्यांना धक्काच बसला. पण आता अभिनेत्यानं आणखी एक व्हिडीओ शेअर करून नेमकं काय झालं, याबाबतची माहिती दिली आहे.

हेही वाचा – Video: “…तेव्हापासून ३६ वर्षे मी दारुचा एक थेंब प्यायलो नाही”; महेश भट्ट यांनी बिग बॉस ओटीटीच्या घरातील सदस्यांना सांगितला ‘तो’ किस्सा

David Johnson, former India cricketer, passes away in Bengaluru at age of 52
David Johnson : भारताचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन यांचे बाल्कनीतून पडून निधन; पोलिसांना आत्महत्येचा संशय?
mcdonald's, Trademark,
ट्रेडमार्कचा वाद : मॅकडोनाल्ड्स पुन्हा बाद
Alka Yagnik diagnosed with rare sensory hearing loss
सुप्रसिद्ध बॉलीवूड गायिका अलका याज्ञिक यांना दुर्मिळ आजाराचं निदान, काहीच ऐकू येत नसल्याची दिली माहिती
Kangana Ranaut Viral Video
“कोणत्या गालावर मारलं..”, पत्रकाराने कंगना रणौत यांना लोकांमध्ये विचारला प्रश्न? Video चा हा अँगल चुकवू नका, Video
HR Issues Warning To Employee For Using Instagram Netflix At Work employee received an official notice via email
‘कंपनीचा वेळ, वीज अन् इंटरनेट…’ कामावर इन्स्टाग्राम, नेटफ्लिक्स पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला HR ची नोटीस; पोस्ट पाहून नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
Loksatta viva Cannes International Film Festival for Indians important
कानच्या निमित्ताने..
job opportunity
नोकरीची संधी: आर्मी डेंटल कॉर्प्समधील संधी
The pavan guntupalli Co-founder of Rapido did not give up despite being rejected 75 times
Success Story: याला म्हणतात जिद्द! ‘रॅपिडो’च्या संस्थापकाने ७५ वेळा नकार मिळूनही मानली नाही हार अन् उभी केली तब्बल ६७०० कोटींची कंपनी

काल राकेश बापटनं इन्स्टाग्राम स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याच्या हाताला सलाईन लावल्याचं दिसत होतं. आता राकेशनं दुसरा व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, “मी काल एक व्हिडीओ पोस्ट केला होता. पण मला नक्की काय झालंय? याबद्दल मी काही सांगू शकलो नाही त्यासाठी सगळ्यांना सॉरी. मी सध्या शूटिंगनिमित्तानं दुबईत आहे. खूप उष्ण वातावरण आहे. त्यामुळे मला स्ट्रोक आला. ताप आहे. मी सध्या युएईमध्ये असून सुखरुप आहे. लवकरच मी पुन्हा काम करायला सुरुवात करेन. धन्यवाद, तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल. तुमच्या प्रार्थना अशाच माझ्यासोबत असू द्या. तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या.”

हेही वाचा – “मला लोक घाबरतात” स्वतःच्या प्रतिमेविषयी शरद पोंक्षेंचे वक्तव्य, म्हणाले, “…त्यामुळे माझी सटकते”

राकेश बापट बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वात झळकल्यानंतर अधिक प्रसिद्धीझोतात आला होता. बिग बॉस ओटीटी या घरात राकेशचे अभिनेत्री शमिता शेट्टीबरोबर चांगलं बॉन्ड निर्माण झालं. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या भावना व्यक्त केल्या आणि ते दोघं रिलेशनशिपमध्ये आले. शोनंतर दोघं बरेच महिने एकत्र होते. परंतु २०२२च्या अखेरीस राकेश व शमिताचा ब्रेकअप झाला.

हेही वाचा – Video: लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? ‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटील म्हणाली…

दरम्यान राकेशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘तू आशिकी’, ‘बात हमारी पक्की है’, ‘कुबूल है’, ‘नच बलिए ६’ या शोमध्ये झळकला होता. तसेच ‘वो तुम बिन’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘कुछ दिल ने कहा’, ‘कोई मेरे दिल में है’ यांसारख्या चित्रपटात त्यानं काम केलं आहे. शिवाय राकेश मराठी चित्रपटातही दिसला होता.