‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी आई झाली आहे. तिने गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. अदिती गुप्ता असं या अभिनेत्रीचं नाव आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली.

३७ वर्षांची अदिती गुप्ता हिने १२ ऑगस्ट रोजी जुळ्या मुलींचं स्वागत केलं. मुलींच्या जन्माची माहिती तिने जवळपास दोन महिन्यांनी शेअर केली आहे. अदितीने Nervous, Excited & Emotional !! अखेर आमचं छोटं सिक्रेट जगाबरोबर शेअर करत आहोत, असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे.

पाहा अदिती गुप्ताची पोस्ट-

अदिती गुप्ता व तिचा पती कबीर चोप्रा लग्नानंतर सात वर्षांनी आई-बाबा झाले. अदितीने ही आनंदाची बातमी शेअर केल्यावर सेलिब्रिटी व चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कृतिका कामरा, मृणाल देशराज, किश्वर मर्चंट, सेहबान अझीम, द्रष्टी धामी, अनिता हसनंदानी, आमला हुसैन, अनिरुद्ध दवे, गौतम रोडे, आमिर अली, सिड मक्कार, रोहित पुरोहितसह अनेक कलाकारांनी अदिती व कबीर यांचं अभिनंदन केलं आहे.

अदिती गुप्ताने २०१८ मध्ये बिझनेसमन कबीर गुप्ताशी लग्न केलं. दोघांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर डिसेंबर महिन्यात खासगी समारंभात लग्न केलं होतं.

अदिती गुप्ताच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. नंतर तिने धडकन जिंदगी की, कबूल है, इश्कबाज या मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. तिने IC814 सीरिजमध्ये विजय वर्मा, राजीव ठाकूर, पत्रलेखा यांच्याबरोबर काम केलं होतं.