‘रोडिज’मध्ये झळकलेला शिव ठाकरे मराठी बिग बॉसमुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आला. त्यानंतर शिवने हिंदी ‘बिग बॉस १६’मध्ये प्रवेश केला आणि तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. मग तो ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये झळकला. सध्या तो ‘झलक दिखला जा सीझन ११’मध्ये पाहायला मिळतं आहे. याच शोमध्ये शिवने मुंबईत नवं घर घेतल्याचा खुलासा केला आहे.

शिव ठाकरेने मराठीसह हिंदी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्याला एका पाठोपाठ एक रिअ‍ॅलिटी शो मिळतं आहेत. अशा या लोकप्रिय मराठमोळ्या शिवने काही दिवसांपूर्वी मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. याबाबत तो ‘झलक दिखला जा सीझन ११’मध्ये खुलासा करत म्हणाला की, “हे वर्ष माझ्यासाठी खूपच खास आहे. माझं आयुष्य बदललं आहे. मी करिअरची सुरुवात खूप सावकाश केली होती. पण या वर्षात माझ्यासाठी खूप गोष्टी बदलल्या आहेत.”

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सईमुळे येणार मोठा ट्विस्ट, मुक्ता-सागरसह कोळी कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकणार

“मला वाटायचं मी सेकंड हँड कार घेईन पण मी यावर्षी ३० लाख रुपयांची नवीन कार खरेदी केली. तसंच लोकं म्हणतात मुंबईत घर घेण्यासाठी आयुष्य जात. पण मी मुंबईत नवं घर घेतलं आहे. झलकच्या कुटुंबाबरोबर ही आनंद बातमी शेअर करू इच्छितो की, ८ दिवसांपूर्वीच मी नवं घर बुक केलं आहे.”

हेही वाचा – “…ते २०२४मध्ये पूर्ण करायचं आहे”, ‘झिम्मा’ गर्ल्स यंदा मागे कोणती गोष्ट सोडणार? सायली संजीव म्हणाली…

फराह खानने दिलं शिवला खास गिफ्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवने ही आनंदाची बातमी सांगितल्यानंतर ‘झलक दिखला जा सीझन ११’ची परीक्षक फराह खान म्हणाली की, “साजिद मला कालचं म्हणाला, तू घराची चावी घेतली. त्यामुळे मी तुझ्या नव्या घरासाठी खास गिफ्ट आणलं आहे.” यावेळी फराह खानने शिवला नव्या घरासाठी गणपतीची सुंदर मूर्ती दिली.