‘स्टार प्रवाह’वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अर्जुन आणि सायली या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं आहे. आज या मालिकेच्या संपूर्ण टीमनं मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. याचे फोटो व व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहेत.

आज ‘ठरलं तर मग’ या मालिकेचा २००वा भाग प्रसारित होत आहे. याच निमित्तानं मालिकेच्या संपूर्ण टीमनं मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांच दर्शन व शुभाशिर्वाद घेतले. यावेळी मालिकेच्या टीमबरोबर निर्माते आदेश बांदेकर, पत्नी सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर हेही उपस्थितीत होते. स्टार प्रवाहनं यादरम्यानचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करून लिहिलं की, “आपण प्रेक्षकांनी या २०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार.”

हेही वाचा – Video : “…अन् त्या एका मिनिटात मी १७ हजार वेळा मेले”, क्रांती रेडकरनं सांगितला अनुभव

हेही वाचा – “उगाचच कुणाच्यातरी पदरी…”, ‘बाईपण भारी देवा’च्या यशावर दिग्दर्शक विजू मानेंचे वक्तव्य

‘ठरलं तर मग’ या मालिकेनं गेल्या काही वर्षांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला टीआरपीच्या स्पर्धेत मागे टाकलं आहे. सध्या टीआरपीच्या यादीमध्ये आदेश बांदेकरांची ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – ‘त्या’ कृतीमुळे चिडलेल्या काजोलच्या आईने धर्मेंद्र यांना लगावली होती कानशिलात, नंतर काळा धागा घेऊन…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टनुसार, ‘ठरलं तर मग’ या मालिकेला ६.९ रेटिंग होते. तर ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला ६.७ रेटिंग मिळाले होते. या दोन मालिकांनंतर ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिका अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर होत्या.