Jui Gadkari Playing Ludo : शूटिंगमध्ये कलाकारांकडे बऱ्याचदा फावला वेळ असतो. या वेळात सर्व जण आपल्याला आवडणाऱ्या विविध गोष्टी करतात. त्यात आता जुई गडकरी या वेळात नेमके काय करते त्याचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

जुई गडकरीने मराठी मनोरंजन विश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या दमदार अभिनयाने ती घराघरात पोहचली आहे. जुई सध्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करते. येथे ती सायली हे पात्र साकारत आहे. या पात्रामुळे जुईने प्रत्येकाच्या मनात स्वत:चे हक्काचे स्थान निर्माण केले आहे. जुई नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते, चाहत्यांना सेटवरील आणि आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करते. आता देखील जुईने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा: “घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी

जुईने सोशल मीडियावर आजवर शूटिंगच्या सेटवरील अनेक मजा-मस्तीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. आता तिने शूटिंगमध्ये थोडा फावला वेळ मिळाल्यावर ती काय करते हे सांगितले आहे. जुई व्हिडीओमध्ये थेट लूडो गेम खेळताना दिसत आहे. लूडो गेम खेळताना चार किंवा दोन व्यक्तींची आवश्यकता असते. मात्र, जुई हा गेम स्वत:च एकटीने खेळत आहे. तिने याचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जुई सेटवर शूटिंगमध्ये फावला वेळ मिळाल्याने लूडो खेळते. त्यासाठी तिने एका टेबलवर लूडो गेम ठेवला आहे, त्यावर तिने ठिपक्यांचा ठोकळा फिरवला तेव्हा पहिलेच तिचा ठोकळा सहा ठिपक्यांचा पडला; त्यामुळे ती फार खूश झाली आणि नंतर स्वत: एकटीच निळ्या रंगाच्या सोंगट्यांसह लूडो गेम खेळू लागली.

व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच…” असे लिहित तिने हसण्याचे इमोजी दाखवले आहेत. तसेच पुढे तिने “डीओपींनी मला ऐ पोरी… अशी हाक मारली आणि ते नेहमी मला असेच म्हणतात आणि मी सध्या एकाच रंगातले लूडो खेळतेय”, असेसुद्धा कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनीदेखील यावर अनेक कमेंट केल्यात. जुई मालिकेत सायली हे पात्र साकारते, त्यामुळे एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले, “मिसेस सायली सापशिडी खेळा आणि त्या महिपत, साक्षी, प्रिया आणि नागोबाला सापाच्या तोंडी द्या.” २०२२ पासून जुई ‘ठरलं तर मग’ मालिकेत काम करत आहे.

हेही वाचा : मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा

u

जुई गडकरी २०१० पासून छोट्या पडद्यावर काम करते. मात्र, तिला खरी ओळख मिळाली ती २०११ मध्ये आलेल्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून. या मालिकेनंतर जुईला प्रत्येक व्यक्ती कल्याणी या नावाने ओळखू लागला. कल्याणीप्रमाणेच आता तिचे सायली हे पात्रसुद्धा प्रेक्षकांना फार आवडले आहे.

Story img Loader