Zee Marathi Kamali Serial Promo : ‘कमळी’ मालिकेत सध्या अन्नपूर्णा आजींमुळे कमळी आणि तिच्या मैत्रिणींना कबड्डी खेळण्याची संधी मिळाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. कामिनीच्या हस्तक्षेपामुळे मुख्याध्यापक सुरुवातीला फक्त अनिकाच्या टीमला कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देतात. ‘कमळी’च्या टीमला या स्पर्धेत एन्ट्री मिळणार नाही असा निर्णय मुख्याध्यापक परस्पर कामिनीशी बोलून घेतात. याशिवाय ‘कमळी’ला कॉलेज सोडून जा असंही सांगितलं जातं.

अचानक आलेल्या संकटांमुळे ‘कमळी’ पूर्णपणे खचून जाते. पण, एका क्षणानंतर आता रडून उपयोग नाहीये, आपण आपला हक्क पुन्हा मिळवला पाहिजे या विचाराने ‘कमळी’ परत सरांची भेट घ्यायला जाते. यावेळी कामिनी ‘कमळी’ला कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्याचा हक्क नाहीये असं निक्षून सांगते पण, याचवेळी कॉलेजमध्ये अन्नपूर्णा आजीची एन्ट्री होते. ‘कमळी’ला जाब विचारणारी तू कोण आहेस? कॉलेजमधील निर्णय बदलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा प्रश्न अन्नपूर्णा आजी मुख्याध्यापकांना विचारतात. यावेळी प्रिन्सिपल सर कामिनी आजीकडे बोट दाखवतात. यामुळे अन्नपूर्णा आजी भयंकर संतापते. ती कमळीच्या पाठिशी ठामपणे उभी राहते आणि तिला आणखी एक संधी द्या, तिची वेगळी टीम या स्पर्धेत सहभागी होईल असं सर्वांना सांगते.

आता येत्या काळात प्रेक्षकांना ‘कमळी’ मालिकेत आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कमळी कार्यक्रमानिमित्त घरात सजावट, रोषणाई करत असते. इतक्यात ती चिकटपट्टी मागते. यावेळी तिचं लक्ष नसतं, हृषी तिचा आवाज ऐकून लगेच चिकटपट्टी घेऊन घेतो आणि कमळीचा तोल जाऊन ती पडणार इतक्यात हृषी तिला सावरतो.

आता हृषी आणि कमळीला एकत्र पाहिल्यावर नयनतारा आधीच भडकलेली असते. त्यात अनिका सुद्धा हृषीच्या आईचे कमळीविरोधात कान भरते. नयनताराला समोर पाहताच दोघेही जागच्या जागी स्तब्ध होतात. तर, दुसरीकडे नयनताराच्या मनात हृषी-कमळीच्या नात्याबद्दल शंका निर्माण होते. खरंतर, सध्या या दोघांच्या मनात असं काहीच नाहीये.

zee
प्रोमोवरील कमेंट्स

आता कमळी-हृषीला एकत्र पाहिल्यावर नयनतारा काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा विशेष भाग ११ सप्टेंबर रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे.