कित्येक सामान्यांची असामान्य स्वप्नं पूर्ण करण्यात ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा खूप मोठा सहभाग आहे. काही स्पर्धक इथे निराश होतात तर काही चांगली रक्कम जिंकून स्वतःची आणि इतरांची स्वप्नं पूर्ण करतात. महानायक अमिताभ बच्चन हे गेली कित्येक वर्षं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत पण तरीही तशी सर कुणालाच येत नाही. केबीसीचा १४ वा सीझन सुरू झाला आहे आणि चक्क या पर्वात दुसरा स्पर्धक करोडपती झाल्याचं समोर आलं आहे.

हॉटसीटवर बसलेल्या दिल्लीच्या शाश्वत गोयल या स्पर्धकाने कमाल करून दाखवली. गेल्याच महिन्यात एका स्पर्धकानी आणि पाठोपाठ या महिन्यात शाश्वतने करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. सोनी टीव्हीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या भागाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. शाश्वत यांनी १ कोटी रुपये जिंकले आहेत. खेळाच्या या टप्प्यापर्यंत फार कमी स्पर्धक आजवर पोहोचले आहेत.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात येणार चक्क सुपरहिरो; घरातील सदस्यांची उडाली तारांबळ

शाश्वत एका इ-कॉमर्स कंपनीमध्ये स्ट्रॅटजी मॅनेजर म्हणून काम करतात. खरंतर या कार्यक्रमात स्पर्धकाबरोबर आणखीन एक व्यक्ती तिथे हजर असते, पान शाश्वत मात्र कुणालाच बरोबर घेऊन आले नव्हते. यावर बच्चन यांनी विचारल्यावर त्यांनी यामागचं कारण सांगितलं. शाश्वत सांगतात की त्यांची आई २००० पासून जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला आहे याची खूप मोठी चाहती होती. त्यांच्या आईचं स्वप्न होतं की आपल्या मुलाला एकदा त्या हॉटसीटवर बसलेलं बघायचं, पण कोविडच्या दुसऱ्या लाटेत त्यांच्या आईचं निधन झालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शाश्वत सलग ९ वर्षं या हॉटसीटवर बसण्यासाठी धडपड करत होते. अखेर यावर्षी त्यांना संधी मिळाली, पण हे चित्र बघायला त्यांची आई आज त्यांच्याबरोबर नसल्याने ते फार भावूक झाले आणि त्यांना अश्रु अनावर झाले, आता बिग बींनी शाश्वत समोर ७.५ कोटी रुपयांचा प्रश्न ठेवला आहे. शाश्वत या प्रश्नाचं अचूक उत्तर देणार की नाही हे आज रात्री ९ वाजता समजेलच. शाश्वतच्या आधी कोल्हापूरच्या कविता चावला या ह्या सीझनच्या पहिल्या करोडपती स्पर्धक बनल्या होत्या.