मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळे तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चांगलीच चर्चेत असते. समाजातील तिला न पटणाऱ्या गोष्टी, तिचे विचार ती तिच्या पोस्टमधून बिनधास्तपणे मांडते. त्यामुळे तिला बऱ्याचदा ट्रोलही केलं जातं. अनेकदा त्या ट्रोलर्सना ती सडेतोड उत्तर देते. आता तिने एका कमेंटला दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

केतकीनेही काल न्यू इअरचं जोरदार सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत ती “माफ करा पण कधीही विसरू नका… हॅप्पी न्यू इयर” असं म्हणत दारू पितानाही दिसतेय. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलं की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”

आणखी वाचा : “…तर भीमा कोरेगावला जाऊन बघा,” अरुण कदम यांची पोस्ट चर्चेत

आता तिच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तर काहींनी तिला ट्रोल केलं. पण एका ट्रोलरला उत्तर देताना तिने शिवीचा वापर केला. एका नेटकऱ्याने तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं, “हिंदू आहेस ना, मग न्यू इअरला हिंदू देवाला हात जोडतात… तू दारू पिताना व्हिडीओ का काढतेस… खूप तरुण मुलं तुला फॉलो करत आहेत. काही चांगलं लोकांसमोर ठेव हीच अपेक्षा. हॅप्पी न्यू इयर.”

हेही वाचा : “मी तुमच्यासाठी घटिया औरत…” केतकी चितळेने नेटकऱ्याला सुनावले खडेबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्याच्या या कमेंटवर केतकीनेही उत्तर दिलं. त्या नेटकऱ्याला एक शिवी देत तिने लिहिलं, “हे ग्रेगोरियन नववर्ष आहे. पंचांगानुसार नवीन वर्ष नाही. अर्थात तुमच्या पिढीला हा साधा फरक माहित असण्याची अपेक्षा ठेवणं हा माझा मूर्खपणा आहे.” त्यासोबतच तिने पुढे हसण्याचा इमोजीही टाकला. आता तिच्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.