‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने प्रसिद्धीझोतात आले. अभिनेते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या स्पष्ट आणि बेधडक स्वभावामुळे ते कायमच चर्चेत असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बरेच अनुभव किरण माने फेसबुकवर शेअर करत असतात. त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

किरण माने यांनी अलीकडेच ‘रमा राघव’ मालिकेच्या सेटवर प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर या दोन जुन्या मैत्रिणींची भेट घेतली. यापूर्वी या तिघांनी मिळून ‘मुलगी झाली हो’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात येण्याआधी किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते. परंतु, अचानक त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यांच्यावर अनेक आरोप देखील करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

हेही वाचा : ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या मंचावर स्त्री वेशात अवरतले अर्जुन, मल्हार अन्…; महाअंतिम सोहळ्याचा प्रोमो आला समोर

किरण मानेंची पोस्ट

काही नातीच अशी असतात, ज्यांची कित्येक काळ भेट नाही झाली तरी ती ताजी टवटवीत राहतात! तब्बल दोन वर्षांनंतर प्राजक्ता केळकर आणि श्वेता आंबीकर भेटल्या. ते ही अचानक ‘रमा राघव’ च्या सेटवर. किती बोलू आणि किती नको असं झालं…धमाल केली आम्ही.

‘मुलगी झाली हो’च्या वेळी माझ्यावर खोट्या आरोपांच्या फैरी झडत असताना… अचानक स्वत:च्या करिअरची पर्वा न करता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहीलेल्या या माझ्या जिगरी मैत्रीणी! या दोघींसोबत शितल गिते आणि गौरी सोनारही होत्या. “किरणसर, वेळ पडली तर अभिनय सोडू पण, तुमच्यावर विनाकारण होणारे आघात आता गप्प बसून पाहू शकत नाही. आम्ही तीन वर्ष रोज पाहतोय तुम्हाला. भल्या माणसाची ही खोटी बदनामी आम्हाला आता सहन नाही होत.” असं म्हणत प्रोडक्शन हाऊस, चॅनलचा दबाव झुगारून जाहीरपणे सगळ्या न्यूज चॅनलवर या रणरागिणी निर्भिडपणे ‘सत्य’ बोलल्या.

माझ्यासाठी आयुष्यातला तो अविस्मरणीय आणि अद्भूत क्षण होता. जगात स्त्रियांना आदर आहे तो अशा निडर सावित्रीच्या लेकींमुळेच.

प्राजक्ता-श्वेता, तुम्हाला कामात बिझी असलेलं पाहून लै लै लै भारी वाटलं… आनंदी रहा… खुश रहा… लब्यू

किरण माने

हेही वाचा : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी पतीसह पोहोचली माधुरी दीक्षित, तर रितेश-जिनिलीयाला पाहून पापाराझी म्हणाले, “दादा…”

दरम्यान, किरण मानेंनी प्राजक्ता आणि श्वेता या दोन मैत्रिणींचं भरभरून कौतुक करत वेळप्रसंगी त्यांनी साथ दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ‘तेरवं’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.