‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून ओंकार भोजनेला ओळखले जाते. ओंकार हा सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी ओंकार भोजनेने ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावालकरचा खूप मोठा चाहता असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता अंकिताने ओंकार भोजने आणि तिच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावालकरने ‘दॅट ऑड इंजिनिअर’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला ओंकार भोजनेबद्दल विचारणा करण्यात आले. त्यावेळी तिने त्या दोघांमध्ये फक्त मैत्रीचे नातं असल्याचे स्पष्टीकरण दिले.
आणखी वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

“ओंकार भोजने आणि मी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. मला काही दिवसांपूर्वी एक अभिनेते भेटले होते, त्यांनी मला माझ्या आणि ओंकार भोजनेच्या लग्नाबद्दल विचारले. त्यावर मी त्यांना नाही, असं काहीही झालेले नाही”, असे अंकिताने म्हटले.

“ओंकार हा मित्र म्हणून एक खरंच खूप चांगला व्यक्ती आहे. मी सिनेसृष्टीतील नाही. माझा सिनेसृष्टीशी काहीही संबंध नाही. पण जेव्हा मला एकटं वाटतं किंवा एखादी गोष्ट मला कळत नाही, त्यावेळी जर मी कोणाला मेसेज करु शकते तर तो व्यक्ती म्हणजे ओंकार भोजने. त्याला मी एखादा विषयाबद्दल सहज विचारु शकते.

माझं कुठेही काहीही अडलं आणि जर मी त्याला सांगितलं, तर तो असा व्यक्ती आहे की एकतर तो स्वत: उभा राहिल किंवा तो इतर मित्रांना तिथे उभा करु शकेल. तसा तो माझा सिनेसृष्टीतील एक मित्र आहे. पण तो शनिवार-रविवार सोडून बाकी सर्व दिवस माझ्यासाठी उपलब्ध असतो. कारण शनिवार-रविवार नाटकाचे प्रयोग सुरु आहेत, असं त्याने मला सांगितलंय”, असेही तिने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : सासू, नवरा आणि वडील शाकाहारी असतानाही स्पृहा जोशी मांसाहार प्रेमी कशी? उत्तर देत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ओंकार भोजने हा सध्या ‘करुन गेलो गाव’ या नाटकात काम करताना दिसत आहे. या नाटकाचे विविध प्रयोग सध्या सुरु आहेत. काही महिन्यांपूर्वी ओंकार भोजनेची प्रमुख भूमिका असलेला ‘सरला एक कोटी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता लवकरच तो ‘कलावती’ नावाच्या चित्रपटातही झळकणार आहे.