List of contestants of Laughter Chef’s season 3: काही रिअॅलिटी शो हे लोकप्रिय ठरतात. यामध्ये खतरों के खिलाडी, बिग बॉस, डान्स इंडिया डान्स अशा अनेक रिअॅलिटी शोचा समावेश आहे. तसेच मास्टरशेफ, सेलिब्रिटी मास्टरशेफ हे शोदेखील लोकप्रिय ठरले आहेत. यामध्ये लाफ्टर शेफ या शोचादेखील समावेश आहे.
लाफ्टर शेफच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही पर्वांना मोठ्या प्रमाणात टीआरपी मिळाला. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक जेवण बनवण्याबरोबरच प्रेक्षकांना खळखळून हसवतात, त्यामुळे प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन होताना दिसते. आता या
लाफ्टर शेफच्या तिसऱ्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार हे जाणून घेऊ…
१. कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेक
लोकप्रिय विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी कश्मिरा शाह लाफ्टर शेफच्या आधीच्या पर्वातदेखील दिसले होते. विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी कृष्णा ओळखला जातो. तसेच या जोडीमध्ये छोटी-छोटी भांडणे होतात, त्यावेळीदेखील ते इतरांना खळखळून हसवतात. आता हे जोडपे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
२. विवियन डिसेना
‘मधुबाला’फेम अभिनेता विवियन डिसेना या सीझनमध्ये नवीन स्पर्धक आहे. अभिनेत्याच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. याबरोबरच तो बिग बॉस १८ मध्येदेखील स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. आता अभिनेत्याला नेहमीपेक्षा एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
३. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. तेजस्वी प्रकाश यापूर्वी सेलिब्रिटी मास्टर शेफमध्ये दिसली आहे.
४. ईशा मालवीय
बिग बॉस असो वा पती, पत्नी और पंगा शो असो, ईशा कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते.
५. अभिषेक कुमार आणि समर्थ जुरेल
बिग बॉस १७ मध्ये अभिषेक कुमार व समर्थ जुरेल यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ते लाफ्टर शेफच्या दुसऱ्या सीझनमध्येदेखील एकत्र दिसले होते.
याबरोबरच ईशा सिंग, एल्विश यादव, गुरमित चौधरी आणि त्याची पत्नी देबिना, जन्नत झुबेर, अली गोनीदेखील या सीझनमध्ये दिसणार आहेत. आता कोणते कलाकार प्रेक्षकांची मने जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भारती सिंग शोचे सूत्रसंचालन करणार आहे, तर शेफ हरपाल सिंग सोखी हे शोचे परीक्षक असणार आहेत.
