Krystle D’souza Gulaam Gouse Deewani Breakup : ‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम अभिनेत्री क्रिस्टल डिसुझाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. क्रिस्टलचं ब्रेकअप झालं आहे. ३ वर्षांपासून ती कश्मिरी बिझनेसमन गुलाम गौस दीवानीला डेट करत होती. आता दोघेही वेगळे झाले आहेत.
३५ वर्षांची क्रिस्टल डिसुझा व गुलाम दोघांनी इन्स्टाग्रामवर त्यांचं नातं अधिकृत केलं होतं. दोघे एकमेकांबरोबर फिरायला जायचे. एकत्र पार्टी करायचे. तसेच एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करायचे. आता क्रिस्टलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गुलामबरोबरचा एकही फोटो नाही.
गुलाम गौस दीवानी व क्रिस्टल डिसुझा यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. पण गुलामच्या अकाउंटवर क्रिस्टलबरोबरचे काही व्हिडीओ अजूनही आहेत. क्रिस्टलच्या वाढदिवसानिमित्त गुलामने हे खास रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केले होते.
एका महिन्यापूर्वी झालं ब्रेकअप
क्रिस्टल डिसुझा आणि मलिक गुलाम गौस दीवानी यांचं ब्रेकअप झाल्याची पुष्टी त्यांच्या जवळच्या लोकांनी केली आहे. त्यांचं ब्रेकअप एक महिन्यापूर्वी झालं, असं त्यांनी सांगितलं नाही.क्रिस्टल तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांशी फार जास्त गोष्टी शेअर करत नाही. त्यामुळे तिने ब्रेकअपवर टिप्पणी करण्यास नकार दिला.
क्रिस्टल डिसुझाची ब्रेकअपवर प्रतिक्रिया
टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात क्रिस्टल डिसुझाशी संपर्क साधला. पण तिने यावर “कोणतीही टिप्पणी करायची नाही” अशी प्रतिक्रिया दिली. क्रिस्टल व गुलाम दोघेही तीन वर्षांपासून डेटिंग करत होते. पण आता त्यांचं ब्रेकअप झालंय. क्रिस्टल आणि गुलाम यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.
लग्नाबद्दल क्रिस्टल डिसुझाचं मत
एका मुलाखतीत क्रिस्टलला तिच्या व गुलामच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं होतं. “जोपर्यंत माझ्या बोटात अंगठी नसेल, तोपर्यंत मी कोणत्याही नात्याला नाव देऊ इच्छित नाही. मी आतापर्यंतच्या नात्यांमधून हेच शिकले आहे की काहीही कायमस्वरुपी नसते. गोष्टी बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते, मग ते पर्मनंट होईपर्यंत ते जाहीर का करावं? माझ्यासाठी, लग्न ही कायमस्वरुपी गोष्ट आहे,” असं क्रिस्टल म्हणाली होती.
गुलाम गौस दीवानीबद्दल क्रिस्टल डिसुझा म्हणालेली….
“हा माणूस माझ्यासाठी खूप खास आहे. मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात असताना गुलाम माझ्याबरोबर होता. त्याने मला सांभाळलं, मला हिंमत दिली आणि मला जाणीव करून दिली की मी जशी आहे तशी आहे. आता जर मी पडद्यावर आत्मविश्वासाने आणि धैर्याने अभिनय करू शकत असेल तर ती फक्त त्याच्यामुळेच. तो नेहमीच मला आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देतो,” असं क्रिस्टल डिसुझाने म्हटलं होतं.
