झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. नुकतंच कुशलने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे कुशलला वेगळी ओळख मिळाली. या कार्यक्रमामुळे त्याचा चाहतावर्गही खूप वाढला. कुशलही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. कुशलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : Video : करंदी, काळं चिकन अन् सोलकढी; सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधून नीना कुळकर्णींनी ऑर्डर केलं जेवण, म्हणाल्या “पदार्थांची चव…”

या व्हिडीओत कुशल हा अभिनेता सिद्धार्थ जाधव याचे मिमिक्री करताना दिसत आहे. यावेळी त्याने सिद्धार्थप्रमाणे हुबेहुब कपडे परिधान केले आहे. तसेच त्याने त्याच्याप्रमाणे हेअर स्टाईलही केली आहे. यावेळी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची टीम ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.

कुशलने या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. “आणि जेंव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते”, असे कॅप्शन कुशलने या व्हिडीओला दिले आहे. तसेच त्याने सिद्धार्थला हा व्हिडीओदेखील टॅग केला आहे.

आणखी वाचा : तेजश्री प्रधानने सांगितला सुखी जीवनाचा मंत्र, म्हणाली “प्रत्येक वेळी स्वतःला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची टीम ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये सहभागी झाली होती. यावेळी सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.