छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’मुळे अभिनेता महेश जाधव घराघरांत लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने ‘टॅलेंट’ ही भूमिका साकारली होती. पुढे त्याने ‘कारभारी लय भारी’ ही मालिका तसेच ‘फकाट’, ‘माऊली’ अशा चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला.

हेही वाचा : नेमप्लेटवर आई-बाबांचं नाव, लंडनची थीम अन्…; ‘असं’ सजवलं ऋतुजा बागवेने नवीन घर; म्हणाली…

अभिनयाव्यतिरिक्त महेश जाधव गेली अनेक वर्ष प्रचंड मेहनत घेऊन पॉवरलिफ्टिंगची तयारी करत होता. नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये’ (२०२३-२४) त्याला पुरुषांच्या ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळालं. अभिनेत्याने सुवर्णपदकाला गवसणी घातल्यावर खास पोस्ट शेअर केली आहे. “शाळेत उंचीमुळे मला पहिल्या रांगेत उभे करायचे आज फाइट केल्यामुळे मला सुवर्णपदक मिळालं आहे” असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : “आदल्या दिवशीचा चिकनचा रस्सा, शिळी भाकरी अन्…” दुबईत फिरणाऱ्या मराठी अभिनेत्याला येतेय मराठमोळ्या खाद्यपदार्थांची आठवण, म्हणाला…

महेश जाधवची पोस्ट

“शाळेत प्रार्थनेच्या रांगेत नं. 1 ला उभा ‘Height’ मुळे
आज तुमच्यासमोर हे Gold घेऊन उभा ‘Fight’ मुळे”

आज तुम्हाला सांगायला आनंद होताये की 2nd Maharashtra State Para Powerlifting Championship 2023- 24 काल कल्याण येथे झाली त्यामध्ये Men’s 49Kg मध्ये मी Gold मेडल मिळवले.

यामागे खूप मेहनत तर आहेच पण त्याचबरोबर अनेक लोकांचा सल्ला, मार्गदर्शन पण आहे. यात मला माझे Trainer कलीम सर ,माझा मित्र विनोद तावरे यांचे खूप सहकार्य मिळाले. तसेच एखाद्या खेळाडूला Practice, Workout बरोबर Diet पण खूप important असतं तशी माझी हे खा हे खाऊ नको बघणारी डॉ. पूर्णिमा डे…आणि मला कायम सपोर्ट करत आलेला खूप मोठ्ठासा मित्रपरिवार, या सगळ्यांचा मी आभारी आहे.

आणि तुम्ही प्रेक्षक कायम माझ्यावर प्रेम करत आला आहात तर ही दुसरी Innning तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र!

हेही वाचा : “विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”

View this post on Instagram

A post shared by Mahesh Jadhav (@mahesh_jadhav15)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महेश जाधवच्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील असंख्य कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ऋतुजा बागवे, शिवानी बावकर, निखिल चव्हाण, स्नेहन शिदम या कलाकारांनी कमेंट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.