Lakhat Ek Amcha Dada: ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मालिकेतील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. हे कलाकार जितके कामामुळे चर्चेत असतात. तितकेच ते त्यांच्या डान्स व्हिडीओमुळेही चर्चेत असतात.

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सतत डान्स व्हिडीओ शेअर करत असतात आणि हे व्हिडीओ व्हायरलही होतात. सध्या पुड्या म्हणजे अभिनेता स्वप्नील कणसे आणि राजश्री म्हणजे अभिनेत्री ईशा संजय यांच्या डान्स व्हिडीओची चर्चा आहे.

हेही वाचा – लेक-जावयासाठी परिणीती चोप्राच्या आईने रेखाटलं सुंदर चित्र, राघव चड्ढा सासूबाईंना म्हणाले…

अभिनेत्री ईशा संजयने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ईशाने स्वप्नीलबरोबर जबरदस्त डान्स केला आहे. वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांनी गायलेलं ‘तुरू तुरू चालू नको…’ या गाण्यावर दोघं थिरकताना दिसत आहेत. हा डान्स पाहून सूर्यादादा म्हणजे अभिनेता नितीश चव्हाणच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Video: ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकीचा जाऊबाईबरोबर दाक्षिणात्य लोकगीतावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेता नितीश चव्हाणने ईशा संजय आणि स्वप्नीलचा डान्स पाहून हटके प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलं आहे, “अयो बास बास.” तसंच “नादखुळा”, “एक नंबर दादा”, “वंटास”, “दर्जा”, “जबरदस्त जोडी”, “लय भारी दादा”, “तुम्ही खूप छान डान्स केलात”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

अभिनेता नितीश चव्हाणची प्रतिक्रिया
अभिनेता नितीश चव्हाणची प्रतिक्रिया

हेही वाचा – Bigg Boss 18: सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये रजत दलालकडे दिला मोठा अधिकार; ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मालिकेत काय सुरू आहे?

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. कारण अखेर तुळजाने सूर्यादादासमोर प्रेमाची कबुली दिली आहे. तिने खास सप्राइज देऊन सूर्यादादाला प्रपोज केलं. यामुळे सूर्याला धक्काच बसला. पण, तुळजाने तिच्या मनातील सूर्याबद्दलची भावना व्यक्त केली. त्यामुळे आता सूर्या आणि तुळजाच्या प्रेमाच्या गोष्टीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. अशातच तेजश्रीच्या लग्नाची सुपारी फुटली आहे. तेजूच्या लग्नात काय होणार? तिचं लग्न शत्रूशी होणार की समीर निकमशी हे पाहणं उत्सुकेतचं असणार आहे.