Akshaya Deodhar on importance of Navratri: अभिनेत्री अक्षया देवधर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिची भावना ही भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे.

“त्याआधी पुण्यात मी कधीच…”

‘लक्ष्मी निवास’ या मालिकेआधी अक्षयाने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली. राणा दादा आणि अंजली ही जोडी प्रचंड गाजली. विशेष म्हणजे फक्त ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही जोडी लोकप्रिय आहे. अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी २०१६ ला लग्नगाठ बांधली. हार्दिक जोशी कोल्हापूरचा आहे.

आता अक्षयाने एका मुलाखतीत कोल्हापूरला गेल्यानंतर देवीशी तिचे नाते कसे तयार झाले, याबद्दल वक्तव्य केले आहे. अक्षयाने राजश्री मराठीशी संवाद साधला. यावेळी अक्षया म्हणाली, “मला असं वाटतं की देवीशी खरं नातं कोल्हापूरलाच निर्माण झालं. कारण- त्याआधी पुण्यात मी कधीच कोणत्या देवीच्या मंदिरात गेल्याचं मला आठवत नाही. कारण- पुण्यात गणपतीला जाणं हे थोडं आम्ही प्रथा असल्यासारखे पाळायचो.”

अक्षया पुढे म्हणाली, “पण कोल्हापुरला गेल्यानंतर देवीशी खरंच खूप वेगळं नात निर्माण झालं. आजपर्यंत मी देवीला सांगितलेली प्रत्येक इच्छा देवीने पूर्ण केली आहे. त्यामुळे सुद्धा देवीची उपासना होत असते. काही ना काही कारणाने कुठल्यातरी माध्यमातून उपासना चालू असते.”

अभिनेत्री असेही म्हणाली, “आयुष्यातील प्रत्येक नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज असते आणि मला वाटते. त्या पाठिंब्याची गरज असते. आध्यात्म किंवा कुठल्याही गोष्टीची उपासना, साधना करणं यातून आपल्याला ते बळ मिळतं, असं मला वाटतं.”

“देवी हे शक्तीचे रुप आहे, त्यामुळे ती शक्तीला आपल्याला तिच्याकडून कायमच जास्त मिळत असते. त्यामुळे मला असं वाटतं की नवरात्रीचे नऊ दिवस कुठेतरी आपण आपल्यातलं बळ वाढविण्यासाठी नवरात्रीचा उपवास करणं हे तिची साधना करण्यासाठी केल्या जातात. तसंच, मानसिक आणि शारीरिक दोन्हींमध्ये आपण स्वत:मध्ये बदल कऱण्यासाठी, आधीचं सगळं मागे टाकून नवीन सुरुवात करण्यासाठी ही नवरात्र घालवावी. त्यामुळे बळ मिळवण्यासाठी ही उपासना सर्वांनी करावी. कारण नवरात्रीमध्ये सर्वांत जास्त सकारात्मकता असते.”