Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. नातेसंबंधांची गुंतागुंत, पात्रांचा भावनिक प्रवास आणि प्रत्येकाची एक वेगळी गोष्ट यामुळे ही महामालिका सातत्याने चर्चेत राहिली आहे.
काही दिवसांपूर्वीच संतोषने दळवी कुटुंबीयांच्या देवघरात असलेले म्हणजेच स्वत:च्याच घरातील पूर्वापार शाळीग्राम विकण्याचा प्रयत्न केलेला असतो. हे सत्य लक्ष्मीसमोर येताच तिला खूप मोठा धक्का बसतो. संतोषने शाळीग्राम विकण्याचा प्रयत्न केलाय या विश्वासघाताने लक्ष्मी खूपच हादरते. लक्ष्मी ते शाळीग्राम परत मिळवते आणि श्रीनिवाससह घर सोडण्याचा निर्णय घेते.
जान्हवी आई होणार…
दुसरीकडे, जान्हवीला तिच्या गरोदरपणाची बातमी कळते आणि नव्या बाळाच्या आगमनाने जयंतच्या वागणुकीत बदल होईल, अशी आशा तिला वाटते. जयंतला ही गुडन्यूज देण्यासाठी तिने एक सरप्राइज प्लॅन केलेलं असतं. केक, फुलांची सजावट करून जान्हवी ही आनंदाची बातमी नवऱ्याला सांगते. पण, आपली बायको प्रेग्नंट आहे हे समजल्यावर जयंतच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आता तो बाळाबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या सगळ्यात भावनाच राजकारणातील यश देखील लक्षवेधी ठरणार आहे. कारण ती आता पक्षाचा नवा चेहरा बनणार आहे. आता येत्या काही दिवसांत लक्ष्मी आणि शांता आजी जान्हवीच्या घरी राहायला जाणार आहे. यामुळे जानूला जयंतच्या जाचातून थोडा दिलासा मिळणार आहे. मात्र, त्या दोघींची उपस्थिती जयंतला अजून भडकवेल का, याची भीती जान्हवीला आहे. दरम्यान, जान्हवी पुन्हा ऑफिस जॉईन करत जयंतची पर्सनल मॅनेजर बनणार आहे. यामुळे विश्वाबरोबरची तिची जुनी मैत्री सुद्धा पुन्हा फुलू लागणार आहे.
दुसरीकडे संतोष आणि सिंचना यांच्यातील वाद विकोपाला जात असून, खर्चाची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने संतोष हरीशवर चिडतो. सिंचना मात्र हरीशला तिच्या वडिलांकडून पैसे घेऊन बिझनेस सुरू करण्याचा दबाव टाकते. तर, सिद्धूची आई रेणुका अजूनही आनंदीला स्वीकारायला तयार नाही. आनंदीला पुन्हा बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा आग्रह ती धरते.
दरम्यान, लक्ष्मी श्रीनिवासने राहतं घर सोडल्यामुळे याचा दळवी कुटुंबावर काय परिणाम होणार? भावनाचं यश तिला कोणत्या नव्या जबाबदाऱ्या देईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दररोज रात्री ८ वाजता पाहायला मिळतील.