Lakshmichya Pavalani Upcoming Twist: चित्रपट, मालिका, नाटक, गाणी व वेब सीरिज ही मनोरंजनाची महत्वाची साधने आहेत. प्रत्येक माध्यमाचे वेगळे स्वरूप आहे. गाणी कधीही, कुठेही ऐकली जाऊ शकतात. नाट्यगृहात जाऊन नाटके पाहिली जातात. तर, चित्रपटगृहात जाऊन किंवा अनेकदा ओटीटीवर चित्रपट पाहिले जातात.
परंतु, वेब सीरिज पाहण्यासाठी ओटीटी हे माध्यम सध्या लोकप्रिय ठरत आहे. या सगळ्यात प्रेक्षकांचे दररोज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका सज्ज असतात.
प्रेमकथा असणाऱ्या, भयकथा, गुन्हेगारीवर आधारित, विनोदी अशा विविध जॉनरवर आधारित वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. प्रत्येक जॉनर व मालिकेचा प्रेक्षकवर्ग वेगळा असतो. मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवतात.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत मोठा ट्विस्ट
आता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या टलक्ष्मीच्या पाऊलांनीट या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. या मालिकेत कला आणि अद्वैत चांदेकर ही दोन मुख्य पात्रे पाहायला मिळतात. घराला जोडून ठेवणारी, तितकीच हुशार असलेली, तसेच अन्याय सहन न करणारी कला प्रेक्षकांची लाडकी आहे. अद्वैत व कला यांच्यामध्ये होणारी छोटी-मोठी भांडणे प्रेक्षकांना आवडतात. मात्र, अनेकदा रोहिणी तिच्या मुलाला हाताशी धरून कलाविरुद्ध अनेक कट-कारस्थाने करताना दिसते.
लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, चांदेकरांच्या घरात मंगळागौरीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी कलासह घरातील इतर महिलादेखील सुंदर पारंपरिक पेहरावात तयार झाल्या आहेत. काही खेळदेखील खेळले जात आहेत.
प्रोमोमध्ये ऐकायला येते की, सासू-सून मंगळागौर स्पर्धा शेवटची फेरी जिंकण्यासाठी चांदेकर घरातील लक्ष्मीची पाऊलं पुढे पडत आहेत. हा फेरीतील शेवटचा टप्पा. त्यादरम्यान, कला एका बंद बॉक्सजवळ गेलेली दिसते. त्यावेळी रोहिणी म्हणते की, शेवटचा टप्पा नाही, शेवटची घटका आहे.
प्रोमोमध्ये पुढे ऐकायला येते की, कला तो बंद बॉक्स जवळ जाऊन उघडते. त्यामध्ये एक साप असतो. कलाला काही कळण्याअगोदरच तो साप डंख मारतो. कला खाली पडते. अद्वैतची आई तिच्याजवळ जाते. कलाच्या तोंडातून फेस येतो. सगळे जण कलाच्या सभोवती गोळा होतात. अद्वैतला कलाच्या हातावर सापाने दंश केल्याचे दिसते. तो बॉक्स उघडून पाहतो. त्याला साप दिसतो. डॉक्टर येतात, कलाला तपासतात. अद्वैतची आई डॉक्टरांना विचारते की काय झालं? माझी सून बरी आहे ना? त्यानंतर डॉक्टर मान खाली घालतात. सगळ्यांना धक्का बसतो. हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने रोहिणीचा हा डाव कलाच्या जीवावर बेतणार का?, अशी कॅप्शन दिली आहे.
आता कलाचा जीव वाचणार का, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.