Arbaaz Patel Leeza Bindra: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात सर्वात चर्चेत राहिलेले स्पर्धक अरबाज पटेल व निक्की तांबोळी होते. कमिटेड असलेला अरबाज ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीच्या प्रेमात पडला आणि त्याने गर्लफ्रेंड लीझा बिंद्राशी ब्रेकअप केलं. अरबाज व निक्की दोघेही बिग बॉस संपल्यापासून एकत्र आहेत, मात्र लीझा सोशल मीडियावरून गायब होती. अखेर ती इन्स्टाग्रामवर परतली आहे.
लीझाने आता जवळपास १० महिन्यांनंतर सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली आहे. लीझा सोशल मीडियावर परत सक्रिय झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट तसेच स्टोरी शेअर केली आहे. लीझाचे चाहते तिला इन्स्टाग्रामवर पुन्हा सक्रिय झालेलं पाहून आनंदी आहेत.
लीझाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. “मी फक्त माझं आयुष्य जगत आहे. जेव्हा तुम्ही शांत होता, तेव्हा आयुष्य आणखी शांततापूर्ण होतं,” असं कॅप्शन लिझाने तिचा फोटो पोस्ट करून लिहिलं.

पाहा पोस्ट-
लीझाने स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिची आई रडताना दिसतेय. “भावनिक क्षण, माझे आई-वडील मी सोशल मीडियावर परतल्याचं पाहून खूप आनंदी आहेत,” असं तिने लिहिलं आहे.
लीझाच्या या पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. इतकंच नाही तर लीझा इन्स्टाग्रामवर आधी फक्त अरबाज पटेलला फॉलो करत होती. पण सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याआधी तिने अरबाजला अनफॉलो केलं होतं. पण आता पुन्हा ती फक्त एकच अकाउंट फॉलो करत असल्याचं दिसतंय. हे अकाउंट कुणाचं आहे, ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
लीझा जे अकाउंट फॉलो करतेय ते तिचं व अरबाजचं एकत्र फॅनपेज आहे. या इन्स्टाग्राम अकाउंटवर लीझा व अरबाजचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. इतकंच नाही तर या अकाउंटचे फॉलोअर्स १ लाख ७४ हजार आहेत. लीझा हे अकाउंट फॉलो करत असल्याने ती या नात्यातून मूव्ह ऑन झालीये की नाही याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, लीझा सोशल मीडियावर परतल्यावर नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. ती इन्स्टाग्रामवर आल्यावर नेटकरी तिचं स्वागत करत आहेत. तसेच चाहते तिच्या पोस्टवर लाइक्स वर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एकुणच सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे लीझा बिंद्रा चांगलीच चर्चेत आहे.