scorecardresearch

“माझे पणजोबा आणि टिळक तुरुंगात….” ‘लोकमान्य’ मालिकेतील अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा

टिळकांचा प्रभावी इतिहास या मालिकेतून छोट्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.

“माझे पणजोबा आणि टिळक तुरुंगात….” ‘लोकमान्य’ मालिकेतील अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

झी मराठी वाहिनीवरसातत्याने वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित ‘लोकमान्य’ ही मालिका नुकतीच सुरु झाली. या मालिकेत टिळकांच्या लहानपणीची भूमिका साकारली आहे अभिनेता नील देशपांडेने साकारली आहे. विशेष म्हणजे त्याचे कुटुंबीय हे टिळकांच्या परिचयाचे आहेत. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे.

निल देशपांडेने मालिकेच्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की, “ही मालिका लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित आहे. लोकमान्य टिळकांचे जीवन आम्ही याआधी कधीच पाहिले नव्हते, पण आता या मालिकेच्या माध्यमातून आम्ही ते पाहणार आहोत. टिळकांचा बालपणापासून लोकमान्य होण्यापर्यंतचा प्रवास बघा.”

“महाराष्ट्राची हास्यजत्रेत त्याचं टॅलेंट…” ओंकार भोजनेबद्दल वनिता खरातची प्रतिक्रिया चर्चेत

आपल्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती देताना नील म्हणाला, “मी लोकमान्य टिळकांची बालपण आणि किशोरवयीन भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. जेव्हा मला ही भूमिका मिळाली तेव्हा मला वाटले की ही मोठी संधी योग्य आहे. कारण माझे पणजोबा लोकमान्य टिळक यांच्याबरोबर मंडाले तुरुंगात होते. या मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप भाग्यवान आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

…म्हणून मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून बाहेर पडलो; अखेर ओंकार भोजनेचा खुलासा

टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहेत. ‘दशमी क्रिएशन्स’ने मालिकेची निर्मिती केली असून स्वप्निल वारके यांनी दिग्दर्शन केले आहे. बुधवार-शनिवार रात्री ९:३० वाजता या मालिकेचे प्रसारण होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 16:19 IST

संबंधित बातम्या