अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या हिंदी कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील या बहुचर्चित डान्स शोमध्ये तिने सहभाग घेतला. एकापेक्षा एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करत ती प्रेक्षकांप्रमाणेच या शोच्या परीक्षकांचं मन जिंकत आहे. नुकत्याच तिच्या एका परफॉर्मन्सची माधुरी दीक्षितला भुरळ पाडली आणि तिने दिलेल्या पोचपावतीमुळे अमृताला अश्रू अनावर झाले.

आणखी वाचा : “…म्हणून मी गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिले”; मलायका अरोराने सांगितलं कारण

‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अमृताने ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याच्या रिमिक्सवर नृत्य सदर केले. हे मूळ गाणे ‘खलनायक’ चित्रपटातील असून खुद्द माधुरी दीक्षितवर चित्रित झाले आहे. अमृताने या गाण्याचे रिमिक्स करत हटके पद्धतीने या गाण्यावर नृत्य केले. अमृताचा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांना तर आवडलाच पण अमृताचे हे नृत्य पाहून परीक्षकही थक्क झाले.

अमृताचा परफॉर्मन्स पाहून माधुरीनी तिचे खूप कौतुक केले. ती म्हणाली, “आजचा तुझा परफॉर्मन्स म्हणजे मी, नोरा आणि करण यांचे मिश्रण होते. प्रत्येकाची स्टाईल तू या नृत्यात दाखवलीस. तुझे हावभाव, तुझ्या अदा लाजवाब होत्या. सरोज जींबरोबर मी जेव्हा एखादे गाणे करायचे तेव्हा त्यांच्या ‘परफेक्ट’ हा कॉम्प्लिमेंटची मी वाट बघायचे. पण त्याहूनही जर कधी त्यांना माझा डान्स आवडला तर त्या मला १०१ रुपये द्यायच्या. आज त्यांच्याप्रमाणेच मलाही तुला १०१ रुपये द्यावेसे वाटत आहे,” असे म्हणत माधुरीने अमृताला तिच्याजवळ बोलावले आणि १०१ रुपये तिला बक्षीस म्हणून दिले. आपल्या नृत्याला कौतुकाची इतकी मोठी थाप मिळताच अमृतानेही मधुरीला नमस्कार केला.

हेही वाचा : “मला तुझा खूप अभिमान आहे,” माधुरी दीक्षितने केले अमृता खानविलकरचे कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माधुरीचे हे बोलणे ऐकून अमृता खूप भावुक झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. यावर प्रतिक्रिया देतेना ती म्हणाली, “कलाकाराच्या आयुष्यात असे खूप कमी प्रसंग येतात जेव्हा त्याला वाटतं देव त्याच्यासोबत आहे. हा क्षण माझ्यासाठी तसा आहे. वर असं कोणीतरी आहे जे मला सांगतंय तू काम करत रहा, मी तुझ्याबरोबर आहे. मला डानसबद्दल काहीही कळत नव्हते तेव्हापासून मी तुमच्या गाण्यावर नृत्य करत आले आहे. आपण ज्यांना आदर्श मानतो त्या व्यक्तींशी अनेकांची भेटही होत नाही. पण आज मला तुमच्यासमोर तुमच्या गाण्यावर नृत्य सदर करता येतंय याहून चांगल आयुष्य असू शकत नाही.”