Premium

‘महाभारत’मधील ‘शकुनी मामा’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन, ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

actor-gufi-paintal-passed-away
ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं निधन. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

टीव्ही मालिका ‘महाभारत’मध्ये ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेते गुफी पेंटलची यांचं निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. गुफी पेंटल यांच्या पार्थिवावर आज(५ जून) सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुफी पेंटल यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अभिनेत्री टीना घई यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahabharat shakuni mama fame gufi paintal passed away at 78 kak

Next Story
‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्सचा’ : सई आणि शरयू ठरल्या विजेता, बक्षिसाची रक्कम जाणून घ्या