‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. याच कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे निखिल बने. नुकतंच त्याने त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त ‘चला हवा येऊ द्या’ या फेम अभिनेत्री स्नेहल शिदमने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर आता निखिल बनेने कमेंट केली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या फेम अभिनेत्री स्नेहल शिदमने इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा एक फोटो शेअर केला होता. त्यावर तिने “बनू डार्लिंग हॅपी बर्थडे. देव तुझ्यावर अशीच कृपादृष्टी ठेवो. लव्ह यू बेबी”, असे लिहिले होते.
आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन

स्नेहलने वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या या पोस्टवर आता निखिल बननेही प्रतिक्रिया दिली आहे. “थँक्यू डार्लिंग. लव्ह यू”, अशी प्रतिक्रिया निखिल बनेने दिली आहे. त्याबरोबर त्याने हार्ट आणि किसचा इमोजीही शेअर केला आहे.

nikhil bane
निखिल बने कमेंट

दरम्यान अभिनेत्री वनिता खरातच्या लग्नात निखिल बने व स्नेहल शिदमने एक फोटो पोस्ट केला होता. यावेळी ते दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे होते. त्यावेळी स्नेहल ही लाजताना दिसत होती. या फोटोला तिने “पिरतीच्या फडात गं…धरला हात असा…काळीज येंधलं आरल …” असं कॅप्शन दिलं होतं. या फोटोमुळे स्नेहल व निखिल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

आणखी वाचा : “लग्न वर्षभरही टिकणार नाही…”, जितेंद्र जोशीला लग्नानंतर मिळालेला सल्ला, आता १४ वर्षांनी म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर आता पुन्हा एकदा स्नेहलने केलेली पोस्ट आणि निखिल बनेच्या सूचक कमेंटमुळे चर्चाना उधाण आलं आहे. ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोललं जात आहे. मात्र अद्याप त्या दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केलेले नाही.