‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाचा चाहतावर्ग आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी लाफ्टर थेरपीच बनला आहे. करोना काळातही या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं.

हास्यजत्रेची संपूर्ण टीम यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर दौऱ्यावर गेली होती. आता पुन्हा एकदा हे हास्यवीर कलाकार परदेशातील चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ जून महिन्यात दुबईला जाणार आहे. दुबईमध्ये या कार्यक्रमाचे शोज पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे लेखक अभिनेते म्हणून ओळखले जाणारे समीर चौघुले यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

हेही वाचा : Video : ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, जबरदस्त प्रोमो आला समोर

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा दुबई दौरा २ जून २०२४ पासून चालू होणार आहे. शेख राशिद थिएटरमध्ये याचा पहिला शो पार पडेल. याबद्दल समीर चौघुले लिहितात, “नमस्कार! आम्ही हास्यजत्रेचा लाइव्हचा दुसरा सीझन सुरू करत आहोत. आमच्या संपूर्ण टीमबरोबर दुबईमध्ये अनिकेत आमटे आणि अमित फाळके उपस्थित असतील. आम्ही सगळे कलाकार लाइव्ह सादरीकरण करणार आहोत…या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा दौरा यशस्वी करा.”

हेही वाचा : दुखापतग्रस्त हाताला प्लास्टर, सुंदर ड्रेस अन्…; Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली ऐश्वर्या राय बच्चन, ग्लॅमरस अंदाज चर्चेत

दत्तू मोरे, रसिका वेंगुर्लेकर, इशा डे, प्रभाकर मोरे, चेतना भट, नम्रता संभेराव, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत हे कलाकार दुबई दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांनी पृथ्वीक, निखिल बने, शिवाली यांसारखे कलाकार दुबईला येणार नाहीत का? असे प्रश्न समीर चौघुलेंना विचारले आहे. आता दुबईला कोण-कोण जाणार आणि हे कलाकार तेथील प्रेक्षकांना खळखळून हसवून आणखी काय काय धमाल करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : “माझी आई बाबांच्या दुसऱ्या लग्नाला गेली होती,” अभिनेत्री अलायाचा गौप्यस्फोट; म्हणाली, “माझा सावत्र भाऊ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा परदेशात पार पडलेल्या हास्यजत्रेच्या लाइव्ह कार्यक्रमांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.