Maharashtrachi Hasya Jatra Fame Actress : स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिल्या शिक्षिका होत्या. ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी प्रदिर्घ लढा दिला होता. याशिवाय स्त्री शिक्षणात सुद्धा क्रांतिकारी बदल घडवले. यानिमित्ताने आज मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार पोस्ट शेअर सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करत आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील सगळ्या अभिनेत्रींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत खास पोस्ट शेअर केली आहे. ईशा डे, चेतना भट, नम्रता संभेराव, शिवाली परब, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात या सहा अभिनेत्रींनी खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हास्यजत्रेच्या सेटवर सावित्री उत्सव

व्हिडीओच्या सुरुवातीला या अभिनेत्रींनी, “साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचं पाऊल” ही कविता गायली. यानंतर समस्त प्रेक्षकवर्गाला आवाहन करत या अभिनेत्री म्हणाल्या, “नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा. आम्ही सगळ्याजणी आज सावित्री उत्सव साजरा करत आहोत. कारण, ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो. गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. तुम्ही, आम्ही आणि भारतातील सगळ्या मुली आज मोकळेपणाने शिक्षण घेऊ शकत आहेत…याशिवाय शिक्षण पूर्ण झाल्यावर हव्या त्या क्षेत्रात काम करु शकतात…हे ज्यांच्यामुळे शक्य झालंय त्यांच्या जन्मदिवशी उत्सव साजरा झालाच पाहिजे. हा स्त्री जागर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कारण, प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाची, स्त्रियांच्या हक्कासाठी, त्यांच्या सन्मासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी मोठा लढा दिला आहे. त्यांच्या या सगळ्या कार्याची आठवण आपण उराशी कायम जपून ठेवली पाहिजे. म्हणून प्रत्येकाने आपआपल्या उंबऱ्याबाहेर ज्ञानाची एक पणती लावली पाहिजे. आम्ही सगळ्यांनी आमच्या कपाळावर जी चिरी लावलीये ती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आशीर्वाद आहे.”

दरम्यान, आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पोस्ट शेअर करत समस्त महिलांना हा सावित्री उत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं होतं.

सोनाली कुलकर्णीची पोस्ट

तुझ्याकडं गाडी बंगला असो / नसो..
तुझ्याकडं पैसाअडका असो / नसो..
तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो / नसो..
तुझं लग्नं झालेलं असो / नसो..
पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस – आजन्म राहो..
ही चिरी कुणाच्या नावाची नाही..
ही तुझी आहे..
तुला आत्मसन्मान शिकवणारी..

View this post on Instagram

A post shared by Rasika (@rasikavengurlekarofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच या कॅप्शनखाली अभिनेत्रीने, चिरी कपाळावर लावून फोटो काढा व तो मला टॅग करा, एका चांगल्या कार्यासाठी जनजागृती करूयात असं नमूद केलं आहे.