Mahrashtrachi Hasya Jatra Fame Dattu More Welcomes Baby Boy : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. या शोचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यापैकीच प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणजे दत्तू मोरे. दत्तूने नुकताच त्याच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे. ही आनंदाची बातमी दत्तूने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सर्वांना दिली आहे.

दत्तूच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालेलं आहे. अभिनेत्याला मुलगा झाला आहे. दत्तूने बाळाची पहिली झलक या पोस्टद्वारे शेअर केली आहे. यातील एका फोटोमध्ये दत्तू अन् त्याच्या पत्नीने लेकाचा हात अलगद आपल्या हातांवर धरल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये दत्तूच्या लेकाने चिमुकल्या हातांनी बाबाचं बोट पकडल्याचं दिसतंय.

दत्तूने हे गोड फोटो शेअर करत त्यावर “फायनली… तो आला! We now officially have a tiny human to blame. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण…मी सदैव कृतज्ञ आहे.” असं कॅप्शन दिलं आहे.

दत्तूने गुडन्यूज शेअर करताच नेटकऱ्यांसह अभिनेत्याच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हास्यजत्रेतील कलाकारांनी सुद्धा कमेंट्समध्ये दत्तूवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, २३ मे २०२३ रोजी दत्तूने गुपचूप लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्याचं लग्न साध्या पद्धतीत पार पडलं होतं. दत्तूच्या पत्नीचं नाव स्वाती घुनागे ( मोरे ) असं आहे. स्वाती ही व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्रीरोग तज्ञ असून गेल्यावर्षी तिने ठाण्यात स्वतःचं क्लिनिक सुरू केलं होतं. याशिवाय स्वाती अनेक सामाजिक कार्यात सक्रीय असते.

View this post on Instagram

A post shared by Datta More (@dattamore2870)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल थोडक्यात सांगायचं झालं, तर दत्तू व स्वातीची भेट ५-६ वर्षांपूर्वी कॉमन मित्रामुळे झाली होती. पुण्यात दोघं भेटले होते. पुण्यातल्या भेटीनंतर दत्तू व स्वाती फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट झाले. सुरुवातीला दोघंही एकमेकांशी बोलले नव्हते. स्वाती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बघायची. त्यानिमित्ताने तिने एकेदिवशी दत्तूला मेसेज केला आणि मग दोघं एकमेकांशी खऱ्या अर्थाने बोलू लागले.