‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचे लाखो चाहते आहेत. फक्त मराठी नव्हे तर अनेक हिंदी कलाकारही हा कार्यक्रम आवर्जुन बघतात. नुकतंच ‘सर्कस’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर सिंगने महाराष्ट्राच्या हास्यजत्रा या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांचे तोंडभरून कौतुक केलं. ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ म्हणजे अभिनेता गौरव मोरेने रणवीरबरोबर स्किटमध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

यावेळी रणवीर सिंगने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात एक स्किट सादर केले. यावेळी गौरव मोरेही त्याच्याबरोबर या स्किटमध्ये सहभागी झाला. नुकतंच ई-टाईम्सशी बोलताना गौरव मोरेने रणवीर सिंग बरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. “मी फार भारावून गेलो आहे आणि मला त्याबरोबर काम करुन अनुभव झाला”, असे गौरव मोरेने सांगितले.
आणखी वाचा : “तो पैशासाठी गेला…” ओंकार भोजनेच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मागील एक्झिटचं खरं कारण समोर

रणवीर सिंगबरोबर स्टेज शेअर करण्याबद्दल गौरव मोरेला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गौरव म्हणाला, “रणवीर सिंग आमच्या शोमध्ये येणार आहे, हे कळल्यावर मी खूप आनंदी झालो होतो. त्यानंतर जेव्हा आम्हाला कळले की तो आमच्या स्किटचाही भाग होणार आहे, तेव्हा तर माझ्यातील उत्साह आणखी वाढला. तो अतिशय उत्कृष्ट अभिनेता आहे.

रणवीरला ज्या स्किटमध्ये काम करायचं होतं, त्याच्या काही ओळी आम्ही त्याला दिल्या होत्या. त्यानेही त्या अगदी व्यवस्थित वाचल्या आणि त्यात काम केले. ज्यावेळी तो आमच्या कार्यक्रमात आला तेव्हा मी त्याला पाहून भारावलो होतो. मी तुझा खूप मोठा चाहता आहे, असे मी त्याला सांगितले. मला तुझा लुटेरा चित्रपटातील अभिनय फार आवडला. तुझ्या प्रेमळ स्वभाव मला फारच प्रभावित करतो, असेही मी त्याला सांगितले.”
आणखी वाचा : “भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलतोय अन्…” केतकी चितळेने अमृता फडणवीसांना लगावला टोला

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“यानंतर मी त्याला विचारले की तू नेहमी इतका आनंदी कसा असतोस? तुझ्यात ही उर्जा नेमकी कुठून येते? तो खूप नम्र आहे. त्याच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या निमित्ताने मी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचे आभार मानू इच्छितो. त्याला भेटल्यानंतर मी अधिक सकारात्मक आणि आनंदी झालो आहे. मी त्याबरोबर इतक्या जवळून काम करेन याची कधी कल्पनाही केली नव्हती. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे. मी त्याचा खूप आभारी आहे”, असे गौरवने यावेळी म्हटले.