‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे गौरव मोरे, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल बने, ओंकार राऊत, पृथ्वीक प्रताप असे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. यामध्ये अभिनेत्री वनिता खरातने मराठीसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभियनयाची छाप उमटवली आहे.

वनिताने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी सुरुवातीला खूप संघर्ष केला. एकपात्री नाटकापासून सुरु झालेला तिचा प्रवास आता मराठीसह बॉलीवूड चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ जिंकल्यावर वनिताने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘कबीर सिंग’मध्ये तिने साकारलेली घरकाम करणाऱ्या महिलेची भूमिका प्रेक्षकांसाठी कायम लक्षवेधी ठरते. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीला बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती.

हेही वाचा : Video: लग्नानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आयरा खान व नुपूर शिखरे, आई रीना दत्ताने लेक व जावयासह दिली पोज

वनिताचं शिक्षण मुंबईतील कीर्ती महाविद्यालयात पूर्ण झालेलं आहे. अभिनेत्रीकडे कॉलेजच्या दिवसांमध्ये एकेकाळी वडापाव खायला सुद्धा पैसे नसायचे. तेव्हा सगळ्या मित्रांचे पैसे एकत्र करून आम्ही वडापाव खायचो अशी आठवण वनिताने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली होती. तसेच आयुष्यात आणखी बराच मोठा टप्पा गाठायचा आहे असंही वनिताने सांगितलं होतं. नुकताच तिने सोशल मीडियावर १० वर्षांपूर्वीचा एक खास फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : अखेर अक्षराला समजलं भुवनेश्वरीचं सत्य! अधिपतीची खरी आई कोण? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत नवीन ट्विस्ट

वनिताने शेअर केलेल्या १० वर्षांपूर्वीच्या फोटोमध्ये ती फारच वेगळी दिसत आहे. एकपात्री नाटक करतानाचा हा सुंदर फोटो तिच्या खास मित्राने काढलेला आहे. या फोटोला कॅप्शन देत अभिनेत्री लिहिते, “ह्या वनिताला (फोटोमधील) आज खूप आनंद होत असेल” तसेच या कॅप्शनखाली अभिनेत्रीने “आठवणी, १० वर्षांपूर्वीचा फोटो, एकपात्री, अजून खूप बाकी आहे, ये तो सिर्फ शुरुवात हैं” असे हॅशटॅग दिले आहेत.

हेही वाचा : सुरुची अडारकर-पियुष रानडेची लग्नानंतरची पहिली ट्रिप! अभिनेत्री नवऱ्याचा फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वनिताने शेअर केलेल्या फोटोंवर समीर चौघुलेंनी “क्या बात है वनिता खूप प्रेम आणि शुभेच्छा” असं म्हटलं आहे. तर, पृथ्वीक प्रतापने या फोटोवर कमेंट करत “once a गुंडी, always a गुंडी” असं लिहिलं आहे. याशिवाय तिच्या चाहत्यांनी वनिताने केलेल्या आजवरच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.