Shivali Parab Dance Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीराने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. या शोमुळे अनेक नवोदित कलाकारांना संधी मिळाली. त्यापैकीच एक म्हणजे, अभिनेत्री शिवाली परब.
‘कल्याणची चुलबुली’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आणि आपल्या विनोदी अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. शिवाली तिच्या विनोदी अभिनयाने तर चर्चेत असतेच; पण ती तिच्या मनमोहक फोटोंनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावर शिवाली आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
शिवाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करताना दिसते. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो. अशातच शिवालीने एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे, जो अनेकांच्या पसंतीस पडला आहे.
शिवालीने शाहरुख खान आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘मोहब्बत हो गई’ या गाजलेल्या गाण्यावर डान्स केला असून या डान्सचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या डान्समध्ये शिवालीला रुपेश बने या कोरिओग्राफरची साथ लाभली आहे. ९०च्या या गाजलेल्या गाण्यावर शिवाली-रूपेश यांनी स्वतःच्या काही स्टेप्स करत सादरीकरण केलं आहे.
शिवाली परब डान्स व्हिडीओ
जुन्या गाण्याला आपल्या नव्या शैलीत चाहत्यांसमोर आणल्याबद्दल अनेकांनी शिवाली-रुपेश यांचं कौतुक केलं आहे. केवळ चाहत्यांनीच नव्हे तर कलाकारांनी सुद्धा दोघांच्या डान्सला दाद दिली आहे. अभिनेत्री चेतना भटनेही ‘मस्त’ अशी कमेंट करत चेतनाने शिवालीचं कौतुक केलं आहे. तसंच शिवालीची बहीण स्नेहा हिनेसुद्धा तिच्या डान्स व्हिडीओला दाद दिली आहे.
दरम्यान, ‘मोहब्बत हो गई’ गाण्याबद्दल सांगायचं झाल्यास, शाहरुखच्या ‘बादशाह’ या सिनेमातील हे गाणं आहे. अनु मलिक यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे, तर गायक अमिताभ भट्टाचार्य आणि गायिका अलका याज्ञीक यांनी हे गाणं गायलं आहे.