सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय झाले आहेत. या कार्यक्रमातील अनेक विनोदी कलाकारांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला विनोदी कलाकार पृथ्वीक प्रतापने नुकतंच अभिनेते अशोक सराफ यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

पृथ्वीक प्रताप हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने अशोक सराफ यांच्याबरोबरचे काही गोड फोटो शेअर केले आहेत. त्याला त्याने भावूक असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही…” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“अशोक मामांना आपलं नाव माहित असणं, त्यांनी आपल्या कामाचं कौतुक करणं आणि त्यात आपल्या कामासाठी संपूर्ण टीम ला त्यांच्यासमोर अवॅार्ड मिळणं… हे सारे स्वप्नवत आहे”, अशी पोस्ट पृथ्वीक प्रतापने केली आहे.

आणखी वाचा : “‘मनसे’ साठीचं पहिलं भाषण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध विनोदवीराने घेतली राज ठाकरेंची भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अभिनेता पृथ्वीक प्रताप याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विनोदी पात्र साकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ’83’ चित्रपटातही त्याने काम केले होते.