विविध विनोदी भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदारने ‘फु बाई फू’ आणि ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून त्या घराघरात पोहोचल्या. मात्र त्यानंतर काही महिन्यातच या कार्यक्रमाला रामराम केले. आता विशाखा सुभेदारने हा कार्यक्रम सोडण्यामागील कारण सांगितले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. या कार्यक्रमात विशाखाने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. मात्र यातील एका चाहत्याच्या कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांच्या नातवाचे झालं बारसं, नावाचा अर्थ माहितीये का?

“विशू ताई, आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये या हो लवकर. आम्ही खूप मिस करतो तुम्हाला. आम्हाला तुमच्या समस्या समजतात. पण ते सर्व बाजूला ठेवून तुमच्या सर्व चाहत्यांसाठी या हो”, अशी विनंती करणारी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

त्यावर विशाखा सुभेदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आहो, प्रॉब्लेम शोचा काहीच नाही. सातत्याने तेच करतेय म्हणून मी बाजूला झालेय”, असे विशाखा सुभेदार यांनी सांगितले.

vishakha subhedar
विशाखा सुभेदारची कमेंट

आणखी वाचा : …म्हणून वनिता खरातने किर्ती कॉलेजला घेतलेला प्रवेश, समीर चौघुलेंनी केली पोलखोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकात व्यस्त आहे. तसेच त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘शुभविवाह’ मालिकेत काम करत आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे.