Premium

“आमच्या चेतूच्या अंगात…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीसाठी समीर चौघुलेंची खास पोस्ट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम चेतना भटसाठी समीर चौघुलेंनी केलेली पोस्ट चर्चेत

samir-choughule-post-for-chetna-bhat
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम चेतना भटचा आज वाढदिवस. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील कलाकार प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. महाराष्ट्रातील घराघरात या शोचे चाहते आहेत. प्रेक्षक अगदी आवडीने हा शो पाहतात. हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री चेतना भट हिचा आज वाढदिवस आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेतना भटच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता समीर चौघुलेंनी खास पोस्ट लिहिली आहे. चौघुलेंनी चेतना भटबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> Video : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीचा आईसह ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

चेतना भटसाठी समीर चौघुलेंची पोस्ट

Happy birthday चेतना भट…जाड भुवया मानाने मिरवत अत्यंत निर्बुद्ध मुलीचं वरकरणी सोप्प वाटणारं पण खूप कठीण असणारं पात्र ही लीलया रंगवते…अवीट रागिणी म्हणून “हो ना हो ना” म्हणत संयमित अभिनय करताना अचानक मध्येच राग अनावर न झाल्याने ही ज्याप्रकारे लोचन मजनूच्या अंगावर चिडून जाते ते निव्वळ सुखद असत..आमच्या चेतूच्या अंगात “जर्की विनोद” ही ठाई ठाई भरलाय…सासू सुनेच्या प्रहसनात हिच्या अंगात वारं शिरतं आणि हिच्यातली खरी वेडसर मुलगी बाहेर येते आणि जे काही करते ते हसून हसून मुरकुंडी वळते….

हिला स्क्रिप्टमध्ये एक वाक्य असो वा हजार वाक्य…हिला अख्खं स्क्रिप्ट तोंडपाठ असतं…कोणतीही गोष्ट साध्य होईपर्यंत प्रचंड मेहनत करायची हा तिचा गुण मला प्रचंड आवडतो…चेहऱ्यावर नेहेमी निखळ हास्य घेऊन फिरणारी आमची चेतू ही उत्कृष्ट नृत्यांगनासुद्धा आहे. चेतुबरोबर मंच शेअर करणं यासारखा दुसरा आनंद नाही…आपल्या घरावर, माणसांवर,मित्रमैत्रिणींवर नितांत प्रेम करणारी आमची चेतना खूप हळवी सुद्धा आहे. आमच्या chetu ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम…

हेही वाचा>> जेवण ऑर्डर केलं अन्…; नितेश पांडे यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह

समीर चौघुलेंनी चेतनासाठी लिहिलेल्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी चेतनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame chetana bhat birthday samir choughule shared special post kak

First published on: 24-05-2023 at 17:30 IST
Next Story
जेवण ऑर्डर केलं अन्…; नितेश पांडे यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह