‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे. दत्तूने आजवर या कार्यक्रमात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता दत्तूने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. दत्तू मोरे हा विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

दत्तूने मंगळवारी २३ मे २०२३ रोजी कोर्ट मॅरेज करत लग्नगाठ बांधली. दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं. त्याच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. दत्तूने गुपचूप लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेने उरकलं गुपचूप लग्न, पाहा फोटो

दत्तूने नुकतंच त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी दत्तूची पत्नी स्वातीने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर दत्तूने धोती-कुर्ता असा पेहराव केला होता. यावेळी त्या दोघांच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधल्या आहेत.

दत्तूने या फोटोला हटके कॅप्शन दिले आहे. “नवा सोबती, नवी सुरूवात, आशिर्वाद असूद्या”, असे त्याने म्हटले आहे.

आणखी वाचा : “नक्की काय दाखवायचं आहे…” नव्या फोटोशूटमुळे प्राजक्ता माळी ट्रोल, नेटकरी म्हणाले “मराठी इंडस्ट्रीमध्ये…”

View this post on Instagram

A post shared by Datta More (@dattamore2870)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दत्तूने काल त्याच्या प्री-वेडिंगचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नाची माहिती दिली होती. ‘फ्रेम फायर स्टुडिओ’ या इन्स्टाग्राम पेजवरुन दत्तूच्या प्री-वेडिंगचे काही फोटो शेअर करण्यात आले होते. त्याच्या या फोटोंवर रसिका वेंगुर्लेकर, पृथ्विक प्रताप इत्यादी कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.